Online payment electricity bill 31 crore digital way
Online payment electricity bill 31 crore digital way  
अकोला

वीज देयकांचा ‘ऑनलाईन’ ३१ कोटींचा भरणा; ग्राहकांनी निवडला डिजिटल मार्ग

सकाळ वृत्तसेवा

अकोला : वीज देण्याची रक्कम भरण्यासाठी वीज ग्राहकांची रांगेत उभे राहण्याच्या कटकटीतून सुटका व्हावी या उद्देशाने महावितरणकडून डीजिटल माध्यमे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमांची अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील सव्वा दोन लाख ग्राहकांनी निवड करून ३१ कोटीचा भरणा महावितरणकडे केला आहे.

मार्च महिन्यात अकोला परिमंडळात येणाऱ्या अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख २८ हजार वीज ग्राहकांनी ३१ कोटी २८ लाख रूपयांचा भरणा ऑनलाईन माध्यमांचा वापर करून केला असल्याची माहिती महावितरणकडे देण्यात आली. अकोला शहर विभागातून ऑनलाईन वीज देयक भरण्यासाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. अकोला शहरातील ४१ हजार १६ वीज ग्राहकांनी आठ कोटी ६४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

अकोला ग्रामीण उपविभागात आठ हाजर ५६८ वीज ग्राहकांनी एक कोटी ३० लाख रुपयांचा भरणा केला. बुलडाणा उपविभागात १३ हजार ८०९ वीज ग्राहकांनी एक कोटी ६६ लाख, चिखली उपविभागात १० हजार १३२ वीज ग्राहकांनी एक कोटी ९ लाख रुपये, खामगाव शहर उपविभागात एक कोटी ७६ लाख रूपयांचा भरणा केला आहे.

या ऑनलाईन माध्यमांचा वापर

महावितरणची वेबसाईट व मोबाईल ॲप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी महाडिस्कॉम ही वेबसाईट तसेच जून २०१६ पासून मोबाईल ॲपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नेटबॅकींग, क्रेडीट, डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय वापरून ग्राहक ऑनलाईन वीज देयक भरणा करू शकते. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीज जोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ''ऑनलाईन'' वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे.

ऑनलाईन भरणा केल्यास मिळते सुट

लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येते. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.

ऑनलाईनचे मिळते पोच

‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’ द्वारे पोच देण्यात येते. याशिवाय महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल ॲपवर मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT