Panchayat Samiti Primary Health Center Bad medical service sakal
अकोला

अकाेला : उपचार करणारी वैद्यकीय यंत्रणाच व्हेंटिलेटरवर

पं.स.सभापतींनी घेतली प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम जामठी (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ‘मदर’ पीएचसी म्हणून ओळखल्या जाते, मात्र येथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णाची हेळसांड होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पं.स. सभापती उर्मिला डाबेराव यांनी उपसभापती, तसेच पंचायत समिती सदस्यासह साडेनऊ वाजता झाडाझडती घेतली असता, मोठा गौडबंगाल उघड झाला.

जामठी (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रुणांना वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने सेवा मिळत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. याची दखल पंचायत समितीच्या सभापती यांनी ९.३० वाजता पदाधिकाऱ्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. आरोग्य केंद्राची जाऊन झाडाझडती घेतली असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर शेगोकार विना परवानगीने गैरहजर असल्याचे दिसून आले. गत ऑगस्ट २०२१ पासून रुग्णकल्याण समितीची सभा घेण्यात आली नाही, मात्र समितीची मंजुरी न घेता ७४ हजार ६७१ रुपये खर्च करण्यात आला. हा खर्च मार्चमध्ये दाखविण्यात आला.

प्रसुतीगृह, शस्त्रक्रीया कक्ष व इतर बाह्यरुग्ण विभागात स्वच्छता दिसून आली नाही, प्रतिनियुक्तीवर असलेले औषध निर्माण अधिकारी यांची हजेरी पठावर स्वाक्षरी नाही, वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच्या दौरा हलचल नोंदवहीत फेब्रुवारी २०२१ पासून नोंद नाही.

सफाई कामगार स्वप्नील इंगळे नियमित गैरहजर राहत असल्याचेही निदर्शनास आले. डॉ शंकर शेगोकार यांनी मुदतवाढ देण्यात आली, मात्र कार्यालयात कोणताही आदेश उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची, तसेच स्वच्छतेची कोणत्याही प्रकारची सोय नाही. आरोग्य केंद्राच्या परिसरात सर्वत्र घाण साचली असून, मुदत संपलेली औषधी, तसेच न झालेली औषधी उकीरड्यावर पडून असल्याचे दिसून आले, अशा भोंगळ व मनमानी कारभारामुळे रुग्णांना बरे करण्याऐवजी वैद्यकीय स्वतःच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र दिसत आहे.

हा सर्व गौडबंगाल सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाने हा सर्व प्रकार घडून येत असल्याच्या तक्रारीचा पाढा ग्रामस्थांनी सभापती उर्मिला डाबेराव, उपसभापती देवशीष भटकर, माजी सभापती बबनराव डाबेराव, पं.स.सदस्या आम्रपाली तायडे यांच्या समोर वाचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : १८ चेंडूंत ७२ धावा… पृथ्वीचे वादळी शतक, Ranji Trophy स्पर्धेच्या इतिहासातील सहावी वेगवान Century

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध? शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल, होणारा नवरा काय करतो?

UPI Mapper ने घातलाय धुमाकूळ! UPI अ‍ॅप्सच्या हुशारीमुळे युजर्स गोंधळात; NPCI ने घेतला मोठा निर्णय, ऑनलाइन पेमेंट करत असाल तर हे एकदा बघाच

Kolhapur Politics : 'आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरला 50 वर्षे मागे नेले'; खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT