Ashadhi Wari 2024 MSRTC Special Bus Service  Sakal
अकोला

Ashadhi Wari 2024 Special Bus : आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या; स्थानिक प्रवाशांना मिळणार लाभ

Ashadhi Wari 2024 MSRTC Special Bus Service : पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक, श्रद्धाळू विठ्‍ठलाच्या दर्शनासाठी जातात.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक, श्रद्धाळू विठ्‍ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारे विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा स्थानिक प्रवाशांना सुद्धा होणार आहे.

साेलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी निमित्त माेठी यात्रा भरते. त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील हजाराे वारकरी व भाविक भक्त सहभागी हाेतात.

ही बाब लक्षात घेवून मध्य रेल्वेच्या वतीने विठ्‍ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाडी क्र. ०१२०५ नागपूर-मीरज विशेष गाडी नागपूर येथून १४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि मीरज स्थानकावर १५ जुलै रोजी सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१२०६ मीरज-नागपूर विशेष गाडी यात्रा १८ जुलै रोजी मीरज येथून दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे १९ जुलै रोजी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. त्यासोबतच गाडी क्र. ०१२०७ नागपूर-मीरज विशेष गाडी नागपूर येथून १५ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि मीरज येथे १६ जुलै रोजी सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०१२०८ मीरज-नागपूर विशेष गाडी यात्रा मीरज येथून १९ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर २० जुलै रोजी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड व इतर ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

न्यू अमरावती येथून दोन गाड्या

पंढरपूरसाठी न्यू अमरावती येथून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. त्यात गाडी क्रमांक ०१११९ न्यू अमरावती येथून १३ जुलै आणि १६ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर स्थानकावर १४ व १७ जुलै रोजी सकाळी ९.१० वा पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११२० पंढरपूर-न्यू अमरावती १४ जुलै आणि १७ जुलै रोजी पंढरपूर येथून संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल आणि न्यू अमरावती येथे १५ जुलै आणि १८ जुलै रोजी दुपारी १२.४० वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव व इतर ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

खामगाव येथूनही विशेष गाडी

पंढरपूरसाठी खामगाव येथूनही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. सदर खामगाव-पंढरपूर गाडी १४ आणि १७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर स्थानकावर १५ जुलै आणि १८ जुलै मध्यरात्री ३.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ११२२ पंढरपूर-खामगाव विशेष गाडी पंढरपूर येथून १५ व १८ जुलै रोजी पहाटे ५ वाजता सुटेल आणि खामगाव स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT