Passengers traveling to Mumbai, Pune, Nagpur, Kolhapur hit, 18 trains canceled File Photo
अकोला

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर शहरांना जाणाऱ्या प्रवाशांना फटका, १८ रेल्वे रद्द

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर व अहमदबादसह इतर शहरांना जाणाऱ्या प्रवाशांना फटका

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक नागरिकांनी प्रवासाचे बेत पुढे ढकलले असून काहीनी प्रवास न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये अल्प प्रवाशी प्रवास करत असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे १८ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये बहुतांश रेल्वे गाड्या जोडी आहेत. Passengers traveling to Mumbai, Pune, Nagpur, Kolhapur hit, 18 trains canceled

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामांच्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी घराबाहेर पडण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांचा प्रवास रद्द केला आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधील आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आले आहे. या स्थितीमुळे व प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने १८ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

त्यामध्ये गाडी क्रमांक ०२११३ पुणे- नागपूर विशेष ही गाडी ३० जून पर्यंत आणि गाडी क्रमांक ०२११४ नागपूर - पुणे विशेष गाडी २९ जून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१८९ मुंबई- नागपूर विशेष गाडी ०१ जुलैपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२१९० नागपूर-मुंबई विशेष ३० जून पर्यंत. गाडी क्रमांक ०२१११ मुंबई-अमरावती विशेष गाडी ०१ जुलैपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२११२ अमरावती-मुंबई विशेष गाडी ३० जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०२०४१ पुणे-नागपूर विशेष गाडी २४ जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२०४२ नागपूर-पुणे विशेष २५ जून पर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२०३६ नागपूर-पुणे विशेष गाडी ३० जून आणि गाडी क्रमांक ०२०३५ पुणे-नागपूर विशेष ०१ जुलैपर्यंत, गाडी क्रमांक ०२११७ पुणे-अमरावती विशेष गाडी ३० जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२११८ अमरावती-पुणे विशेष गाडी ०१ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२२२३ पुणे-अजनी विशेष ०२ जुलैपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२२२४ अजनी-पुणे विशेष २९ जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०२२३९ पुणे-अजनी विशेष गाडी २६ जून पर्यंत आणि गाडी क्रमांक ०२२४० अजनी-पुणे विशेष २७ जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०१४०४ कोल्हापूर-नागपूर विशेष गाडी २८ जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०१४०३ नागपूर-कोल्हापूर विशेष गाडी २९ जून पर्यंत. गाडी क्रमांक ०११३७ नागपुर -अहमदबाद विशेष गाडी ३० जूनपर्यंत आणि ०११३८ अहमदाबाद-नागपुर विशेष १ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT