अकोला वसुंधरा अभियानात पातूर नगरपरिषद ‘अव्वल’ sakal
अकोला

अकोला वसुंधरा अभियानात पातूर नगरपरिषद ‘अव्वल’

जिल्हाधिकाऱ्यांना लागले राज्यस्तराचे वेध

सकाळ वृत्तसेवा

पातूर : स्थानिक नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियाना’मध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांना राज्यस्तरावर चमकण्याची संधी निर्माण झालेली आहे. अशी, प्रतिक्रिया जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी पातूर भेटी दरम्यान दिली. नगरपरिषदेने गतवर्षी ‘माझी वसुंधरा अभियान’ या मोहिमेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याच कामाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यस्तरावर नगरपरिषदेने आपली कामगिरी संपूर्ण कार्यक्षमतेसह बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा सुद्धा त्यांच्या दौऱ्याचा महत्त्वपूर्ण भाग होता.

पातूर दौऱ्यादरम्यान ओला आणि सुका कचरा याचं खतांमध्ये परिवर्तन करण्याच्या भंडारज बु. येथील नगरपरिषदेच्या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याबरोबरच नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी या प्रकल्पासाठी २४ तास वीज आणि सुरक्षा भिंत बांधून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडला. नगरपरिषद शाळा क्र. दोनच्या आवारात जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसीलदार दीपक बाजड, गटनेते हाजी सय्यद बुऱ्हाण, उपाध्यक्ष एहफाज्जोदिन, आरोग्य सभापती राजू उगले, नगरसेवक सय्यद मुजम्मिल, मो.फैज उपस्थित होते.

यावेळी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या हद्दवाढ, कचरा वेचणाऱ्यांना शहराच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी करून घेणे, नगरपरिषदेच्या चारही शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहीम राबवणे, विजेची बचत करण्यासाठी प्रत्येक घरावर सोलर पॅनल नागरिकांनी आपापल्या घरावर बसवावे, सुवर्णा नदीचा खोलीकरणाचा आणि जलसंधारणाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी मुख्याधिकारी तथा न.प.च्या प्रशासनाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. नगरपरिषदेने चांगले काम केले याबाबत आणि अतिशय उत्तम कार्य करण्याची क्षमता न.प. प्रशासनात आहे. अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक, नगराध्यक्ष तथा गटनेते यांचा समन्वय नगरपरिषदेचा विकासासाठी विकासाची नांदी ठरणार असल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT