पातुर (जि.अकोला) : अपहार करणाऱ्या सचिव पी. पी. चव्हाण यांच्या वर कारवाई होत नसल्याने अखेर सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार बळीराम ताले यांनी सोमवार, ता. १० मे रोजी ११. १५ वजताच्या सुमारास पातुर पंचायत समितीच्या आवारात ‘आत्मदहन’ (Self-immolation) करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याल त्वरित ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. Patur; Attempt of self-immolation of youth in the premises of Panchayat Samiti
विजयकुमार ताले यांचा पातूर तालुक्यातील पातूर आणि चान्नी या दोन पोलिस स्टेशनचे पोलिस शोध घेत होते. आत्मदहनच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी विजय ताले यांना ताब्यात घेण्यासाठी पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी व चान्नी पोलिस स्टेशनचे राहुल वाघ यांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला होता.
सावरगाव झरंडी ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये अपहार केल्याची चौकशी करण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार बळीराम ताले यांनी सोमवारी १० मे रोजी पातूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा ता. ५ मे रोजी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या स्मरण पत्रातून दिला होता.
सावरगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांनी गेल्या सात वर्षांपासून ग्रामपंचायतचा प्रभार दिला नाही. ते झरंडी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असून, ग्रामपंचायतला पाणी फाऊंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखाचे पारितोषिकातून कामे न करता या रकमेचा अपहार केल्याचा आरोप निवेदनातून विजयकुमार ताले यांनी केला होता. परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल किंवा चौकशी केली नाही.
त्यामुळे १५ दिवसाच्या आत चौकशी करून तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांच्यावर कारवाई करा अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत पुन्हा ता. ५ मे रोजी स्मरण पत्रव्दारे आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. २० दिवसांचा कालावधी उलटूनही कारवाई केली नाही. त्यामुळे सोमवारी विजयकुमार ताले यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पातूर व चान्नी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, आत्मदहन करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
संपादन - विवेक मेतकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.