Balkrishna Yevale sakal
अकोला

Patur Crime : अखेर तो विवाहितेचा विनयभंग करणारा पोलीस हवालदार निलंबित

विवाहित महिलेच्या घरात घुसून दार बंद करून आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना २३ एप्रिल रोजी उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

पातुर - तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेच्या घरात घुसून दार बंद करून आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना २३ एप्रिल रोजी उघडकीस आली.

पोलीस कर्मचारी २३ एप्रिलच्या दुपारी विवाहितेच्या घरात घुसला आणि दार बंद केल. व विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केली. महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी घरातून पळ काढला.

सदर घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास एन्काऊंटर करून जीवे मारण्याची धमकी दिली. आणि भ्रमणध्वनीवरून वारंवार फोन करून मानसिक त्रास दिल्या बाबतचे पोलीस कर्मचाऱ्यांचे बोलणे पीडित महिलेने रेकॉर्ड केले आहे. असा आरोप विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे ६ मे रोजी दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

सदर तक्रारीवर चान्नी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांच्या विरुध्द ११ मे रोजी विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांना ११ मे रोजीच्या संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहे. त्यामुळे पोलीस विभागात एकच खडबड उडाली आहे. याप्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांनी चान्नी ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची विचारपूस केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates: पुणे-अहिल्यानगर रोडवर भीषण वाहतूक कोंडी

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

SCROLL FOR NEXT