Petrol crosses 100 again due to price hike File photo
अकोला

दरवाढीमुळे पेट्रोलने पुन्हा ओलांडली शंभरी!

- पावर व स्पीडसह साधारण पेट्रोलच्या दरातही वाढ

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः गत तीन-चार दिवसांपासून पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (Increase in petrol and diesel prices) करत आहेत. त्यामुळे अकोल्यात पुन्हा स्पीड व पॉवरच्या पेट्रोलने शंभरी ओलांडली (Petrol crossed the hundred) आहे. त्यासोबतच साधारण पेट्रोलचे दरही वाढले असून डिझेलच्या दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे.Petrol crosses 100 again due to price hike

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये या वर्षांच्या सुरुवातीपासूनच मोठ्‍या प्रमाणावर वाढ सुरू झाली होती. फेब्रुवारी अखेपर्यंत ही दरवाढ कायम राहिली. या कालावधीत अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर लिटरमागे शंभर रुपयांच्या आसपास पोहोचले. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरांतही अभूतपूर्व वाढ झाली होती. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्‍या वतीने पेट्रोल दरवाढी विरोधा आंदोलन सुद्धा करण्यात आले. परंतु त्यानंतर सुद्धा दरात कोणत्याच प्रकारचा बदल करण्यात आला नाही. परंतु गत महिन्यात मात्र पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले होते. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत होता. परंतु गत तीन-चार दिवसांपासून पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे अकोला महानगर पालिकाक्षेत्रातील पेट्रोल पंपांवर पॉवर व स्पीडच्या पेट्रोलने पुन्हा एकदा शंभरी ओलांडली असून साधारण पेट्रोल शंभरीजवळ पोहचले आहे. डिझेलच्या दरात सुद्धा वाढ झाल्याने प्रवासी व माल वाहतुकदारांना फटका बसत आहे.

अशी झाली दरवाढ (आंकडे रुपयांमध्ये)

तारीख साधारण स्पीड/पावर डिझेल

३ मे ९६.६९ ९९.५२ ८६.३८

०४ मे ९६.८५ ९९.७१ ८६.५८

०५ मे ९७.०३ ९९.८९ ८६.८०

०६ मे ९७.२७ १००.१३ ८७.११

०७ मे ९७.५४ १००.४० ८७.४३

०८ मे ९७.५४ १००.४० ८७.४३

Petrol crosses 100 again due to price hike

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT