court hammer court hammer
अकोला

लैंगिक संबंध : अल्पवयीनच्या संमतीला कायद्याच्या दृष्टीने महत्त्व नाही

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महत्त्वाच्या निकालात अल्पवयीनद्वारा लैंगिक संबंधासाठी संमती देणे कायद्यानुसार अस्वीकार्य असल्याचे मत व्यक्त केले. तसेच न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायमूर्ती विनय देशपांडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पीडितेच्या शाळा सोडल्याचा दाखल्याचे उदाहरण दिले. ज्यावरून ती अल्पवयीन असल्याचे समजते.

पीडितेचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. नंतर त्यांनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास सहमती दर्शवली, असे आरोपीच्या वकिलाने सांगितले. परंतु, खंडपीठाने म्हटले की, स्वत: अल्पवयीन व्यक्तीची धमकी किंवा संमती याला कायद्याच्या दृष्टीने महत्त्व नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याचे वकील संमतीच्या पैलूचा आग्रह धरू शकत नाहीत.

बुलडाणा येथील पीर मोहम्मद घोटू मोहम्मद इस्माईल (२३) याचे अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलगी गेल्या वर्षी १४ जून रोजी त्याच्यासोबत पळून गेली होती. सुमारे दीड महिना ती उत्तर प्रदेशपीच्या कौशांबी येथील त्याच्या घरी राहिली होती. काही दिवसांनंतर इस्माईल बुलडाण्यात परतला आणि पोलिसांनी त्याला १ ऑगस्ट रोजी अटक केली. मुलीने त्याच्यावर अपहरण आणि ४५ दिवस लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले होते.

आरोपीने साडेतीन वर्षांच्या वयाच्या तिच्या धाकट्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच ती त्याच्यासोबत गेली होती, हे मुलीच्या बयाणातून स्पष्ट झाल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. वैद्यकीय अभिप्रायाव्यतिरिक्त, मुलीचे विधान, प्रथमदर्शनी, बलात्काराच्या आरोप लक्षात घेत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT