crime sakal
अकोला

पिस्तुल, जिवंत काडतूस विकणाऱ्याला रंगेहाथ पकडले

एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : देशी पिस्तुल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या एकाला अप्पर पोलिस अधीक्षक दत्त यांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई २३ नोव्हेंबर रोजी चिखली-खामगाव रोडवरील किन्ही महादेव फाट्याजवळ हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

अप्पर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांना जिल्ह्यात एक व्‍यक्ती पिस्तुल व जिवंत काडतूस विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून एएसपी श्रवण दत्त यांनी २३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास चिखली-खामगाव रोडवरील किन्ही महादेव येथे सापळा रचला. माहितीप्रमाणे लाल रंगाची बजाज डिस्कव्हर आली.

यावेळी पोलिसांनी त्यास पकडून त्याची झाडाझडती घेतली असता त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ३ देशी बनावटी पिस्तुल , ४ जिवंत काडतूस किंमत एकूण ४७ हजार रुपये आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. यावेळी पोलिसांनी साबीर खान बिस्मिल्ला खान यास ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील मोटारसायकल, ३ देशी पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे असा एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.

याप्रकरणी पो. ना. गजानन आहेर यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त खामगाव यांच्या आदेशाने अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी, पोहेकॉ गजानन बोरसे , पोना गजानन आहेर, पोना रघुनाथ जाधव, पोना संदिप टाकसाळ, पोना श्रीकृष्ण नारखेडे, पोका राम धामोडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

Pune Water Cuts: धरणे शंभर टक्के भरली, तरीही पाणी कपात का? मनसेची आयुक्तांकडे कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

Pune Municipal Transfers: पुणे महापालिकेत ४०७ कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या; समुपदेशन फेरी टाळल्याने प्रशासनात खळबळ

कुलगाममध्येही 'पहलगाम पॅटर्न'? धर्म विचारून मजुरांची हत्या? तपास सुरू

Revenue Camp: थेऊर समाधान शिबिरात ग्रामीण भागात महसूल दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांची पाणंद रस्त्यांसाठी भरीव निधीची घोषणा

SCROLL FOR NEXT