seed bolls akola.jpg 
अकोला

मनातलं उतरवलं कृतीत आता निसर्गप्रेमी देणार सर्वांना गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील निसर्गप्रेमींनी शुक्रवारी (ता. ५) जिल्हा परिषदेच्या आगरकर विद्यालयात दहा हजार ‘सीड बॉल’ तयार केले. परिसरातील वड, पिंपळ या झाडाचे बीज संकलन करुन ते बीज मातीमध्ये मिक्स करुन त्याचे सीड बॉल तयार करण्यात आले. मनातलं कृतीत उतरवून पर्यावरण प्रेमी आता सीड बॉलचे रोपण करुन जिल्ह्यातील नागरिकांना वृक्षारोपणाचं गिफ्ट देणार आहेत. 

शासनाच्यावतीने वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय, सामाजिक कार्यकर्ते संस्था, संघटनांच्या माध्यमातून खुल्या जागांवर, डोंगरांवर, रस्त्याच्या दुतर्फा, वृक्ष लागवड केली जाते. यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून ‘सीड्स बॉल’ ही संकल्पना पुढे येत आहे. त्याअंतर्गत गत पाच वर्षांपासून जिल्ह्यात वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम करणारे आलेश नमुगा नाथन यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनी 10 हजार सीड बॉल तयार करण्यात आले.

सीड्स बॉल तयार करण्याच्या उपक्रमात जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, अजय गावंडे, नीलेश देव, नरेंद्र चिमणकर, सतीश उंबरकार, आकाश ठाकूर, शिवदत्त शुक्ला, सौरभ बछुका, पूजा काळे, प्रवीण काळे, बंडू बलोदे या निसर्गप्रेमींनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन सीड्स बॉल तयार केले. 

ग्रामीण भागात लावणार ‘प्रयोग’
जिल्ह्यात झाडांची संख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागात सीड्स बॉलच्या माध्‍यमातून वृक्षारोपणाला गती देण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या परिसरासह खुल्या जागेवर व रस्त्यांच्या दुतर्फा सीड्स बॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येईल. सदर उपक्रमाला लोकचळवळीचे रूप सुद्धा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा संकल्प यावेळी शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT