pm modi targeted over road in murtizapur MLA Harish Pimple threatens to warkari viral audio call Sakal
अकोला

Akola News : मोदींना टार्गेट केल्याचा राग...आमदार पिंपळे यांनी दिला वारकऱ्यास दम

मुर्तिजापूर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कारणावरून एका वारकऱ्याने सोशल मीडियावर भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले.

सकाळ वृत्तसेवा

Akola : मुर्तिजापूर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कारणावरून एका वारकऱ्याने सोशल मीडियावर भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले. या कारणावरून आमदार हरिष पिंपळे यांनी आषाढी एकादशीच्याच दिवशी फोनवरून चांगलाच दम दिल्याने एकच खळबळ उडाली.

मुर्तिजापूर शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. असाच रोष अर्जुन लोणारे या वारकऱ्याने शहरातील एका व्हॉट्‍सअप ग्रुपवर व्यक्त केला. यात लोणारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समर्थकांबाबत कटू शब्दात टीका केली.

हा प्रकार भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांपर्यंत पोहचवला. त्यामुळे चिडून आमदार पिंपळे यांनी लोणारे यांनी फोन करून चांगलाच दम देत जाब विचारला. लोणारेही एवढ्यावर थांबले नाही तर पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले होते. याप्रकाराची वार्ता कळताच वारकऱ्यांमधून आमदार पिंपळे यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोणारेंचा माफी मागण्यास नकार

मुर्तिजापूरचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी प्रकरण सावरण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांची माफी मागण्याचा सल्ला लोणारे यांना दिला. मात्र कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

लोणारेंनी अतिशय खालच्या शब्दात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांवर टिका केली. त्यांची भाषा अत्यंत वाईट होती. त्यामुळे त्यांना फोन करून जाब विचारला. यापूर्वी सुद्धा त्यांनी असाच प्रकार केला होता.

- हरिष पिंपळे,आमदार मुर्तिजापूर.

विकासाच्या मुद्यावरून आमची व्हॉट्‍सअपवर चर्चा सुरु होती. त्यात मी कुठेही नावाचा उल्लेख केला नव्हता. मात्र आमदार पिंपळे यांनी चिडून मला मारण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांकडून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

- अर्जुन लोणारे, वारकरी, मुर्तिजापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार?

Navneet Rana: नवनीत राणा यांना बॉम्बने उडविण्याची धमकी; हैदराबादवरून रजिस्टर डाकेने आले पत्र

Solapur News: सोलापुरात आता रात्री २१ ठिकाणी ‘सरप्राईज’ नाकाबंदी; वाहतूक पोलिसही असणार मदतीला; चोरी, दरोड्याच्या घटना रोखण्यासाठी निर्णय

Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?

फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली, व्यासपीठावर उडाला गोंधळ; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT