police bachan singh says priority to safety of women and cattle smuggling Sakal
अकोला

Akola News : महिलांची सुरक्षा, गोवंश तस्करी रोखण्यास प्राधान्य - बच्चन सिंह

पोलिस अधीक्षक; सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेबाबत ठाणेदारांना केले ‘अलर्ट’

सकाळ वृत्तसेवा

Akola News : जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ठाणेदारांना गुन्हेगारांवर वचक बसविण्यासोबतच महिलांची व सार्वजनिक मालमत्तांची सुरक्षा आणि गोवंश तस्करी रोखण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉल येथे सर्व ठाणेदारांची आढावा बैठक घेतली. संपूर्ण जिल्ह्याचा त्यांनी तुलनात्मक आढावा घेतला. यात व्हिजीबल पोलिसींग, रात्र गस्त दरम्यान क्यू आर कोड स्कॅनिग, सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए, मोक्का कायद्याअंतर्गत प्रतिंबंधक कारवाई करण्याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना दिल्यात.

अवैध प्रवासी वाहतूक, फॅन्सी नंबर, विना हेल्मेट, ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचनाही पोलिस अधीक्षकांनी केली. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व विभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार, सर्व शाखा प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

सन २०२३ या वर्षात उत्कृष्ट तपास, गुन्हे उकल, मुद्देमाल हस्तगत, क्‍लिष्ट तपास करणारे, डॉरमन फाईलमधील आरोपी अटक, एमपीडीए कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या एकूण ७२ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने पातूर येथील ८० लाखांची चोरी उघड करणारे आणि पिंजर घटनेतील मुलाचा शोध घेवून खूनाचा गुन्हा उघड करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT