

Son Killed His Father Dombivli Crime
ESakal
डोंबिवली : पत्नीचे वडिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून ३२ वर्षीय मुलाने स्वतःच्या ७० वर्षीय वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.