Akola sakal
अकोला

Akola : अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांची मोहीम

खासगी बसेसची तपासणी सुरू; एकाच दिवसात १२ वाहनांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अकोला : नाशीक येथील खासगी बस जळून झालेल्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अवैध वाहतुकीविरोधात मोहीम उघडली आहे. अकोला शहर वाहतूक शाखेतर्फे शनिवारी रात्री कारवाई करीत एकाच दिवसात १२ लक्झरी बसेवर अवैध प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यवतमाळ येथून नाशिक मार्गे मुंबईला जाणाऱ्या चिंताणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसचा अपघात होऊन लागलेल्या आगीत झालेल्या मोठी जिवितहानी झाली. या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने अकोला शहरातील रामलता चौकामध्ये व लक्झरी बस स्थानक येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे तपासणी मोहीम राबविण्यात आली. लक्झरी बसेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसवून घेतले जात असल्याचे आढून झाले. धोकादायकरित्या प्रवासी बसवून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकूण १२ लक्झरी बस चालक व मालकांवर मोटार वाहन कायद्यांन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरातील सर्व लक्झरी बस मालकांनी तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे. प्रवासी वाहतुकीतील निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. नियमांचे पालन करून पोलिस दलात सहकार्य करावे.

- विलास पाटील, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : आदित्य पंचोली विरोधात दाखल अत्याचार प्रकरणातील FIR रद्द करण्यासाठी 28व्यांदा सुनावणी

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT