अकोट (जि.अकोला) : शासकीय आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या बिगर जीवनावश्यक १५ दुकानदारांवर आज अकोट शहराचे प्रभारी ठाणेदार श्रीरंग सणस यांनी कारवाई केली. police on action mode; Beat the wanderers for no reason
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा पातळीवरून कसोशीने प्रयत्न केले जात आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व वगळून इतर सर्व दुकाने आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. मात्र अकोटमध्ये पालिका महसूल आणि पोलिस प्रशासन यामध्ये समन्वय नसल्याने, शहरात याबाबत पुरेपूर अंमलबजावणी होतांना दिसून आली नाही.
अकोट येथील काही व्यावसायिक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे अनुपालन करत या निर्बंधाला धुडकावून लावत असल्याने शहर पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अकोट शहरातील मुख्य बाजारपेठेतील पंधरा दुकानदारांवर अखेर कलम १८८अंतर्गत गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहेत.यामुळे दुकानदार व नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे, राज्यातील सर्व महानगर पालिका, नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शॉपिंग मॉल सर्व,बिगर जीवनावश्यक दुकाने सर्व आस्थापने १५ मेपर्यंत बंद राहणार आहे. हे नियम मोडणाऱ्यांसाठी पथके ही गठीत करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून अकोट शहरात पालिका, महसूल, पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने आणि दोन आठवडे कुठलीच दंडात्मक कारवाई होत नसल्याचा फायदा घेत अकोट शहरात सर्वच व्यापाऱ्यांनी सरसकट दुकाने सुरू केली होती.
तालुक्यात दररोज वाढती रुग्ण संख्या
तालुक्यात दररोज पन्नासहून अधिक रुग्ण कोरोना बाधित होत आहे. अशावेळी स्थानिक प्रशासन विना मास्क फिरणाऱ्या, सामाजिक अंतर न राखणाऱ्यावर कुठलीच कारवाई करत नव्हते, शिवाजी चौक, अकोला नाका, सोनू चौक, नरसिंग रोड, जिजामाता नगर, परिसरात नागरिक तथा व्यवसायिक नेहमी नियमाचे उल्लंघन करत गर्दी करत होते,यामुळे आज अखेर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच संचारबंदी ची वेळ संपल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना काठ्यांचा प्रसाद देण्यात आला. मूठभर बेशिस्त लोकांमुळे तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असून अशा लोकांना वेळीच आळा घलण्यासाठी ही कारवाई यापुढेही अशीच सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दिलेल्या नियमाचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र आज दुकानदार व नागरिक नियमाचे पालन न करता उल्लंघन करताना दिसून आले.अशा दुकानदारावर आज कारवाई करण्यात आली आहे.
-श्रीरंग सणस, प्रभारी ठाणेदार शहर पो.स्टे.अकोट
संपादन - विवेक मेतकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.