Akola ACB esakal
अकोला

Akola ACB : बार NOC साठी सव्वा लाखाची डिमांड; पोलिस पाटील ACB च्या जाळ्यात, ग्रामसेविका फरार

Bar NOC : अकोला एसीबीनं (Akola ACB) ही कारवाई केली आहे.

योगेश फरपट

Akola ACB : आरोपी पोलिस पाटील यास ताब्यात घेतले असून ग्रामसेविका फरार झाली आहे.

अकोला : यावलखेड शिवारात बारच्या एनओसीसाठी (Bar NOC) सव्वा लाखाची डिमांड केल्याप्रकरणी पोलिस पाटील लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. मात्र, ग्रामसेविका फरार झाली आहे. अकोला एसीबीनं (Akola ACB) ही कारवाई केली आहे.

शहराला लागूनच यावलखेड रेल्वे येथे तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावे यावलखेड शिवारात हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी १,२०,००० रूपयाची मागणी केली. तक्रारीच्या अनुषंगाने शासकीय पंचासमक्ष २४ जून रोजी यावलखेड शिवारात लाच मागणी पडताळणी कार्यवाही करण्यात आली.

तेव्हा पंचासमक्ष तक्रारदाराने हरीदास अभिमान प्रधान, (५३) पोलीस पाटील, ग्राम यावलखेड, रा. यावलखेड ता. जि. अकोला यांच्याकडे हॉटेलच्या कामासंबंधाने आवश्यक असलेल्या दाखले आणि प्रमाणपत्रांबाबत विचारणा केली. याकामासाठी ग्रामसेविकेने १ लाख २० हजार रुपये लागतील, असा निरोप दिला. त्याअनुषंगाने तक्रारदाराने पोलिस पाटील व ग्रामसेविका यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क करून भेटण्याबाबत विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून भेटण्यास टाळाटाळ केली. यावरून आरोपींनी मागणी केलेली लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारणार नसल्याचे व त्यांना संशय आल्याचे तक्रारदारांची खात्री पटल्यावरून पोलिस पाटलास पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बोरगाव मंजू ता. जि. अकोला येथे अप. नं. ३२३/२४ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम- १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पोलिस पाटील यास ताब्यात घेतले असून ग्रामसेविका फरार झाली आहे. ही कारवाई लाच लुचपत विभाग अकोलाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलीस अंमलदार डिगांबर जाधव, प्रदीप गावंडे, संदीप ताले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT