Pradeep Shirskar take charge of Akola local crime branch esakal
अकोला

Akola News : अकोला एलसीबीचा प्रभार प्रदीप शिरस्कार यांच्याकडे; इच्छुक पोलिस निरीक्षकांचा हिरमोड

संतोष महल्लेंची बुलडाणा जिल्ह्यात बदली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांची बुलडाणा जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर अकोला एलसीबीचा प्रभार नव्याने अकोला जिल्‍ह्यात आलेले पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्यात. जिल्ह्याबाहेर गेलेल्या पोलिस निरीक्षकांना सोमवारी कार्यमुक्त करण्यात आले. अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी संतोष महल्ले यांची बुलडाणा जिल्ह्यात बदली झाली असल्याने ते सोमवारी अकोल्यात कार्यमुक्त झालेत.

त्यांच्या जागेवर पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरस्कार हे नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातून अकोला येथे बदलून आले आहेत. अकोला जिल्ह्यात नवीन असलेले शिरस्कार यांच्याकडे एलसीबीचा प्रभार सोपविण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक इच्छुक पोलिस निरीक्षकांचा हिरमोड झाला आहे.

वानखेडेंकडे अकोट फैल, ठाकरे बोरगावचे प्रभारी

अकोला : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर अकोट फैल व बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांचे पद रिक्त होते. यापैकी अकोट फैलचा प्रभार दुय्यक अधिकारी म्हणून नियुक्ती झालेले किशोर वानखेडे यांच्याकडे सोपविण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी दिला आहे. बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचा प्रभार पुरुषोत्तम ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT