अकोला

प्रकाश आंबेडकरांनी कंबर कसली? आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार! आज ऐतिहासिक परिषद

सकाळ डिजिटल टीम

अकोला : ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासह ओबीसीच्या हिताचे व अत्यल्प समाजाचे हित जोपासण्याकरिता ऐतिहासीक परिषद २०२३ चे आयोजन आज (सोमवार) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे करण्यात आले आहे. या परिषदेतून प्रकाश आंबेडकर आगामी निवडणुकांसाठी  रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

वाडेगाव येथील अवलिया अर्जुन महाराज संस्थान येथे आयोजित या परिषदेस मुख्य मार्गदर्शक तथा उद्‍घाटक ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल राऊत तर स्वागताध्यक्ष बालमुकुंद भिरड आहेत.

या परिषदेमध्ये पारीत होणाण्याच्या ऐतिहासीक ठरावाचे वाचक म्हणून ॲड. सप्तोष राहाटे आहे. या परिषदेला मार्गदर्शक म्हणून डॉ. अंजलीताई आंबेडकर देखील उपस्थित राहतील. 

या परिषदेमध्ये शाहिर शितल साठे, सचिन माळी हे प्रबोधनपर गीत गाणार आहेत. ओबीसी व सत्यल्प समाजातील बंधू भगिनींनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यात स्थानिक राजकारणात वंचितचे मोठे वर्चस्व आहे. यापूर्वी विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघात वंचितचा आमदार होता. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नितिन देशमुख आमदार आहेत. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा वंचिकडे खेचून आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्न करणार आहेत. मात्र वंचितने उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यामुळे राजकीय पेच निर्माण होऊ शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT