Akola Lok Sabha 2024 Esakal
अकोला

Akola Lok Sabha 2024: अनुप धोत्रेंना मिळणार तगडी फाईट! प्रकाश आंबेडकरांची निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा

Akola Lok Sabha 2024: आज प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत लोकसभेची निवडणूक लढणार की, स्वतंत्र त्या बद्दल संभ्रम कायम आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी बोलताना म्हटलं की, "आमच्या मागणीला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला कुठेतरी सामावून घ्यायचं म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांचा निर्णय झालेला नाही. आमचाही निर्णय झालेला नाही. मविआमध्येच काही मतदार संघांबाबत मतभेद आहेत. काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली. पण मतभेद असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही मतदारसंघ सेनेने आक्षेप केले आहेत" असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आम्ही चार जागांवर ठाम आहोत.महाविकास आघाडीत काही मतदारसंघात मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंरतु ज्या मतभेदाच्या जागा आहेत ते जाहीर केलेले नाहीत. त्याच्यामध्ये काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. तर शिवसेनेने त्याबाबत आक्षेप घेतलेला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. ते चित्र स्पष्ट झालं की ते आमच्यासोबत चर्चा करायला तयार असतील तर आम्ही देखील त्यांच्यासोबत बसायला तयार आहे, असंही पुढे आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. त्यांचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे त्यांच्या याद्या जाहीर होत नाहीयेत. मी त्यांनी दिलेल्या ४ जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी मी माझ्या पक्षाच्या वतीने २७ मार्चला माझा अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, तर २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू असंही पुढे ते म्हणाले आहेत. मी माझ्या पक्षाच्या वंचितच्या वतीने लढणार आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

लोकांना वाटतं की मी... मांजरेकरांनी सांगितलं शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सिद्धार्थ बोडकेला घेण्याचं कारण

Latest Marathi News Live Update : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

SCROLL FOR NEXT