private bus fare hike on diwali msrtc planning to operate more buses marathi news esakal
अकोला

Diwali Festival 2023 : दिवाळीत खासगी बस भाड्यात दरवाढ; अधिक बस चालविण्याचे महामंडळाचे नियोजन

दिवाळी सुटीत पुणे, नाशिक येथून विदर्भात परत येणाऱ्यांसाठी खासगी बस सेवा महागली आहे

सकाळ वृत्तसेवा

अकोला : दिवाळी सुटीत पुणे, नाशिक येथून विदर्भात परत येणाऱ्यांसाठी खासगी बस सेवा महागली आहे. गर्दीचा हंगाम लक्षात घेवून वाढविण्यात आलेल्या दरांना कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांची लुट सुरू आहे. यावर उपायोजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिक बस चालविण्याचे नियोजन केले जात आहे.

दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यामध्ये भरमसाठ वाढ होते. रेल्वे आरक्षणासाठीही अनेकांना ताटकळत राहावे लागते. पुण्यातून अकोल्याला येणाऱ्या प्रवाशांना इतर वेळेस १२०० ते १५०० रुपये दर आकारले जातात. मात्र, दिवाळी हे दर थेट दुप्पट करण्यात आले आहे.

तिकित आरक्षणासाठी सेवा संकेत स्थळांवर दराबाबत कमालीची अनिश्चितता दिसून येत आहे. एसी स्लिपर बससाठी दोन हजार ते ३५०० रुपयांपर्यंत दर आकारले जात आहे. विशेष म्हणजे, हे वाढविण्याबाबत आरटीओ विभागाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही.

एसटीचे ‘ऑपरेशन दिवाळी’

पुण्यातून अकोल्यात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने ‘ऑपरेशन दिवाळी’ अंतर्गत विशेष बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील वाकडेवाडी परिसरात कंटोनमेंट ग्राउंड भाड्याने घेण्यात येणार असून, या ठिकाणी ३० हून अधिक बसेस अकोला जिल्ह्यासाठी सोडण्यात येणार आहे.

अकोला येथून पुणे येथे पर्यवेक्षकसुद्धा जाणार आहे. परतीच्या प्रवासासाठी १४ ते २५ नोव्हेंबर दरम्यान अकोला-पुणे बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एसटीचे ऑनलाईन आरक्षण ७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये शिवशाहीचे स्लीपर साधी, स्लीपर सिटर अशा सुविधा उपलब्ध राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT