devendra fadnavis esakal
अकोला

Akola News : खासगी रुग्णालायतील अत्यवस्थ रुग्ण शासकीय रुग्णालयात

खासगी रुग्णालयातील अत्यवस्‍थ रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठविले जात असल्याने मृत्यूची संख्या अधिक दिसत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासावर केली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय यंत्रणांनाच दोष देवून चालणार नसल्याचे सांगून खासगी रुग्णालयातील अत्यवस्‍थ रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठविले जात असल्याने मृत्यूची संख्या अधिक दिसत असल्याची सारवासावर केली.

अकोला येथील महाआरोग्य शिबिराच्या उद्‍घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील रुग्ण मृत्यू प्रकरणात बोलताना शासकीय रुग्णालयांच्या सामाजिक बांधिलकेतेमुळे कोणताही रुग्ण नाकारल्या जात नसल्याचे सांगितले. खासगी रुग्णालयात मृत्यूश्रयेवरील रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. येते एकही रुग्ण नाकारला जात नाही आणि पुढेही नाकारल्या जाणार नाही.

त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण शासकीय रुग्णालयात अधिक दिसते. सरासरी मृतांच्या संख्येचा आभासनिर्माण करून त्याचे राजकारण करणे हे नैतिकतेला धरून नाही, असेही ते म्हणाले. सोबतच त्यांनी आरोग्य सेवेत सुधारणा करण्याची गरज असल्याचेही मान्य केले. सुविधा देण्यासाठी निधीची कमरता पडणार नाही, याबाबत त्यांनी आश्वस्त केले. स्थानिक पातळीवर ३० टक्के औषध खरेदी करण्याचे अधिकार दिले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

राऊत काहीही बोलतात!

शिवसेना नेते हे काहीही बोलतात. त्यामुळे त्यांचे बोलणे मी गांभिर्याने घेत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यांचे अडीच वर्ष सरकार होते, तेव्हा काय केले, असा मीसुद्धा प्रतिप्रश्न करू शकतो. मात्र, एखाद्या गंभीर विषयावर तसे करणे तर्कसंगत होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Hindu Population Growth : हिंदू तरुणांनी लवकर लग्न करून पाच मुले जन्माला घालावीत; भाजप खासदारच्या वक्तव्याने खळबळ

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंची 'गर्जना', मुंबईत महामोर्चाला सुरुवात

काही दिसत नाहीय! 2 मिनिटात १३ हजार फुटांवरून कोसळलं विमान, क्रॅशआधीचा ऑडिओ समोर

SCROLL FOR NEXT