Akola News
Akola News  sakal
अकोला

Akola News : समाज, देश एकसंघ राहण्यासाठी संविधानाचे उद्दिष्ट महत्वाचे ; प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली मोठी अपेक्षा

योगेश फरपट

अकोला : एखाद्या परिवारासमोर ज्या प्रकारे जीवन जगण्याचे उद्दिष्ट असते. अगदी त्याच प्रमाणे एखाद्या देशासमोर देखील उद्दिष्ट असते. त्यामुळे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक, गणराज्य घडविण्यासाठी देशाच्या संविधानाचे उद्देशिका ही महत्वाची आहे. त्यांचा प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

अकोल्यात आयोजित संविधान उद्देशिका वाचनाच्या पहिल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तीन हजार महिलांनी ७५ हजार वेळा संविधान उद्देशिकेचे अर्थात संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचन केले. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, बौध्द महासभेचे बौध्द जिल्हा अध्यक्ष पी.जी.वानखडे, विश्वास बोराडे गुरुजी, राजेंद्र पातोडे, निलेश देव, रश्मी देव, प्रमोद देंडवे, वंदनाताई वासनिक, शंकरराव इंगळे, ज्ञानेश्वर सुलताने, श्रीकांत घोगरे, बौध्द महासभा जेष्ठ पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येत मातृशक्तींची उपस्थिती होती. अतिशय शिस्तबध्द हा कार्यक्रम तापडीया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात झाला.

देशाचे संविधानाचा अमृत महोत्सव आज भारतीय बौध्द महासभा आणि अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातुन सुरु करण्यात आला. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येत मातृशक्तीची उपस्थिती होती. त्यांनी सामुहिकपणे संविधान उद्देशिका अर्थात संविधानाची प्रस्तावनेचे वाचन केले. यावेळी बोलताना प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी देशाच्या संविधानचा अमृत महोत्सवाचा विसर अनेकांना पडल्याची खंत व्यक्त केली.

देशाच्या संविधानाच्या आधारावर सर्वांचे जीवन सुसह्य झाले आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेला समान अधिकार, प्रत्येकाला मिळाला मतदानाचा अधिकार हा संविधानातुनच प्राप्त झाला आहे. पण, देशाने संविधान अंगीकार केल्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यास शासन, प्रशासन कुठे तरी कमी पडल्याची खंत प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली. अशा वेळी भारतीय बौध्द महासभा आणि अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाने राबविलेला उपक्रम अकोल्यात नाही तर संपुर्ण देशात अभिनव आणि पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे.

संविधानचे रक्षण ही काळाची गरज असुन तर भारतीयांच्या हक्कांचे रक्षण होण्यास मोलाची मदत लाभेल असे प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रश्मी देव यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत संविधान प्रेमी नागरिकांसह हजारोंच्या संख्येत मातृशक्तींची उपस्थिती होती. केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या या तिरंगा रंगाच्या साड्यांमध्ये महिलांची स्वयंस्फुर्त उपस्थिती येथे होती. या कार्यक्रमामुळे संविधानावरचा विश्वास वृध्दींगत करणे आणि देशाचा संविधान सर्वोच्च असल्याची भावना वाढीस लागली आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हे संविधानाच्या बळकटीकरणासाठी महत्वाचे असल्याचे चित्र आज दिसुन आले.

संविधान उद्देशिकेचे सामुहिक पठण

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौध्द महासभा अकोला, निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने ३००० महिलांच्या उपस्थितीत भारतीय ७५ हजार वेळा संविधानाच्या प्रस्तावनेच्या सामूहिक पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती होती. २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताकाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भारतीय संविधानाचे महत्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ३००० महिलांच्या उपस्थितीत ७५००० वेळा संविधानाच्या प्रस्तावनेचे अर्थात उद्देशिकेचे वाचन करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT