akola sakal
अकोला

कापूस महासंघाच्या लाचखोर सहसर व्यवस्थापकाला शिक्षा

१७ वर्षे चाललेल्या खटल्यामध्ये लाचखोरीच्या प्रकरणात न्यायालयाने ठरवले दोषी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महाराष्ट्र कापूस पणन महासंघाच्या अकोला विभागीय कार्यालयाचे सहसर व्यवस्थापकाला लाचखोरीच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाच्या सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंड ठोठावला आहे. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.के. भालेराव यांनी हा निर्वाळा दिला.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात व १३(एक)(ड), १३(दोन) अंतर्गत मगनलाल नामदेव पाटील यांच्यावर लाच खोरीचा आरोप होता. सन २००५ मध्ये ते महाराष्ट्र कापूस पणन महासंघाचे अकोला विभागीय कार्यालयात सहसर व्यवस्थापक असताना लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधंक विभागाने कारवाई केली होती. फिर्यादी राजेन्द्र पुंडलिक राऊत यांनी ता. ६ जानेवारी २००५ रोजी तक्रार दिली होती की, त्यांची मानोरा येथे गुरुओम जिंनिंग फॅक्टरी असून, गावातील अन्य जिंनींग फॅक्टरीच्या तुलनेत त्यांना कमी कापूस पुरवठा करण्यात येतो.

मगनलाल पाटील यांनी कापूस पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी आधी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती व पुन्हा पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. या फिर्यादी नुसार ता. ७ जानेवारी २००५ रोजी सापळा रचून आरोपीस लाच स्वीकारताना रोख रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात चार साक्षीदारांच्या साक्षी झाल्यात. आरोपीतर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आलेत. न्यायालयाने मगनलाल पाटील यांना दोषी ठरवून कलम सात अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, तर कलम १३ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठवली. सरकारतर्फे ॲड किरण खोत यांनी बाजू मांडली. तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT