Railway special trains on occasion of Mahaparinirvan Day akola sakal
अकोला

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

आजपासून सुटणार गाड्या; प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर-मुंबई व मुंबई-नागपूरच्या दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे दादर येथे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये तीन विशेष गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, सहा विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर दरम्यान धावतील. त्यासोबतच एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावेल.

अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित गाडी

सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक ०२०४० अजनी येथून ७ डिसेंबर रोजी १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर सहा गाड्या

विशेष गाडी क्रमांक ०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि अजनीला दुसऱ्या दिवशी ९.३० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दादर ७ डिसेंबर रोजी ००.४० वाजता ( सहा व सात डिसेंबर रोजी मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी १५.५५ वाजता अजनीला पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ७ डिसेंबर रोजी १२.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ३ वाजता नागपूरला पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ८ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५९ दादर ८ डिसेंबर रोजी (सहा व आठ डिसेंबरच्या मध्यरात्री) ००.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३५ वाजता अजनीला पोहोचेल. सदर गाड्यांना अकोला व मूर्तिजापूर येथे थांबे देण्यात आले आहेत.

असे आहे गाड्यांचे नियोजन

  • नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष ः विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक ०१२६४ ही ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता नागपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी २३.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक ०१२६६ ही पाच डिसेंबर रोजी नागपूर येथून १५.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. सदर गाड्यांना अकोला व मूर्तिजापूर येथे थांबे देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT