अकोला

वादळी वाऱ्यासह पावसाचे बाळापूर शहरात थैमान

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह रविवारी झालेल्या पावसाने बाळापूर शहराची चांगलीच दाणादाण उडवली. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. शहरातील विविध भागात झाडे उन्मळून पडली. तहसील कार्यालय व घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. (Rain with strong winds in Balapur city)


रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वारा व विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाबरोबर वादळाचा जोर अधिक असल्याने त्यात बाळापूर शहर होरपळून निघाले. या वादळाचा मोठा फटका महावितरणला बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील लोटनापूर, कासारखेड, बेलदारपुरा, राजपूतपुरा, ग्रामीण रुग्णालय, कालेखानीपुरा, जुनी चावडी, नाका, धनाबाई विद्यालय, आदमपुरा, औरंगपूरा या भागात वादळाने धुमाकूळ घातल्याने वीस ते पंचवीस वृक्ष वीज वाहिन्यांवर उन्मळून पडले. यामध्ये महावितरणच्या उच्चदाब वीज वाहीनीचे आठ तर लघुदाब वीज वाहिनीचे १५ खांबांसह इतर असे ७० खांब जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे शहरातील वीजपुरवठा रविवारी सायंकाळपासून प्रभावित झाला आहे. महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले असून, बसस्थानकापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे महावितरणने योग्यरित्या मॉन्सूमपूर्व तयारी केल्याने एवढ्या प्रचंड वादळातही महावितरणच्या कुठल्याही उपकेंद्रात बिघाड झाला नसल्याचे सहा. अभियंता नितीन टिकार यांनी सांगितले आहे.

टिनपत्रा लागल्याने एक गंभीर
वादळी वाऱ्यामुळे रजपूतपुरा व आबादनगरातील घरावरील पत्रे उडाली आहेत. यामधे रजपूतपुरा येथील चाळीस वर्षीय व्यक्तीच्या पोटाला टिनपत्रा लागल्याने पोट चिरल्या गेले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच भागात अनेक झाडे उन्मळून पडली.
.......................
तहसील कार्यालयातील कागदपत्रे भिजली
बाळापूर शहरात असलेल्या तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनावर वृक्ष उन्मळून पडला आहे. कार्यालयातील रेकाॅर्ड रुम मधील कागदपत्रे भिजली आहेत. संगणकांचेही खुप मोठे नुकसान झाले आहे.
...................................
तहसील कार्यालयावरील टिनपत्रे उडाली असून, वृक्ष उन्मळून पडला आहे. त्याचबरोबर पुरवठा विभागाच्या संगणकांवर पाणी उडाले आहे. मात्र वीज नसल्याने सुरू केले नाहीत. त्यामुळे संगणकांमध्ये बिघाड झाली की नाही, हे निश्चित सांगता येत नाही. रेकॉर्ड रुम मधील कागदपत्रांचे गठ्ठे बाहेर काढून सुकविण्यात आले आहेत. वादळामुळे जवळ जवळ ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
- डी. एल. मुकूंदे, तहसीलदार, बाळापूर


Rain with strong winds in Balapur city

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT