श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्री रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला आहे.  sakal
अकोला

Ram Navami 2023 : शेगावात उत्सव, कार्यक्रमाची माहिती एका क्लिकवर

शेगावात भाविकांची प्रचंड गर्दी

सकाळ वृत्तसेवा

शेगाव : श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्री रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला आहे. या उत्‍सवामध्ये गुढीपाडवा चैत्र शुद्ध १ ते चैत्र शुद्ध ९ पर्यंत दररोज धार्मिक प्रथा-परंपरेनुसार विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.

यामध्ये दररोज पहाटे काकडा, सकाळी हरिभजन, दुपारी नामवंतांचे प्रवचन, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्‍सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन कीर्तन, प्रवचन श्रवणाचा लाभ घेत आहेत. तसेच बुधवारी धनेश्वर बुवा ढोरे गोरेगाव,

गुरुवारी पंकज बुवा पाटील, भानगुरा यांचे किर्तन झाले असून, शुक्रवारी संजय बुवा ठाकरे, कौंडण्यपूर, शनिवारी पंकज बुवा पवार, पसरणी, रविवारी प्रकाशबुवा जंजिरे, पिंपळवाडी, सोमवारी बळीराम बुवा दौड, अकोला, मंगळवारी गोविंदबुवा चौधरी, केकत निंभोरा २९ मार्च रोजी गणेशबुवा हुंबाड महागाव, ३० मार्च रोजी श्रीरामबुवा ठाकूर, परभणी यांचे कीर्तन होईल. ३० मार्च रोजी मिती चैत्र शु. ९, गुरुवारी श्रीराम बुवा ठाकूर, परभणी यांचे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ''श्रीराम जन्मोत्सवा''चे कीर्तन होईल.

तसेच या उत्सवात अध्यात्म रामायण स्वाहाकारास मिती चैत्र शु. ५, रविवार, २६ मार्चला आरंभ होईल. रामनवमीच्या दिवशी चैत्र शु. ९. गुरुवार, ३० मार्चला सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. दुपारी उत्सवाची रथ, अश्यासह पालखी परिक्रमा निघेल. ३१ मार्च रोजी मिती चैत्र शु. १०, शुक्रवारला संजयबुवा लहाने, करंजी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी व गोपालकाला होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT