Rape of five year old girl year old Accused Life imprisonment sakal
अकोला

Akola | अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीस जन्मठेप

चान्नी पोलिस स्टेशनंतर्गत घडली होती घटना; पीडिता अवघी पाच वर्षांची बालिका

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पातूर तालुक्यातील सस्तीयेथील गजानन शिवाजी गवाई (६०) या वृद्धाने एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी.पिंपळकर यांचे न्यायालयात आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना नोव्हेंबर २०१९ मध्ये चान्नी पोलिस स्टेशनंतर्गत घडली होती.

थोडक्यात हकीकत अशी की, ता. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी पीडित अल्पवयीन मुलगी (वय ५ वर्षे) हिच्या आजीने पोलिस स्टेशन चान्नी येथे फिर्याद दिली की, तिची नात गजानन शिवाजी गवाई किराणा दुकानावर चॉकलेट आणण्याकरिता गेली होती. दुकानदाराने तिला दुकानामध्ये बोलावून तिचा विनयभंग केला.

याबाब पीडितेने तिच्या आजीस सांगितले असता पीडितेची आजी दुकानात गेली व त्याला जाब विचारला. तेव्हा उलट तिलाच धमकावून ‘तुमच्या ने जे होते ते करा' अशी धमकी दिली. तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयातील युक्तीवादानंतर गजानन शिवाजी गवई यास अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्या प्रकरणी न्यायालयाने भा.द.वि. कलम ३७६ (२)(आय) मध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपे दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, ३७६(२)(जे) मध्ये आजीवन कारावास, व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, कलम ५०६ मध्ये दोन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास व पोक्सो कायदा कलम तीन व चारमध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास आणि कलम सात व आठमध्ये पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली.

वरील सर्व शिक्षा सोबत भोगावयाच्या आहेत. वरील प्रमाणे एकूण दंड एक लाख ६५ हजार रुपये आहे. सदर दंडाची रक्कम दोषीकडून वसुल झाल्यास त्यापैकी अर्धी रक्कम पीडितेस देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षातर्फे पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पीएसआय रामराव राठोड यांनी प्रकरणात तपास केला. सरकार पक्षातर्फे सहा.सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी मोहन ढवळे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT