Rapid antigen test of every shopkeeper, akola MLA Randhir Savarkar instructs health center 
अकोला

प्रत्येक दुकानदाराची रॅपिड अँटिजेन टेस्ट करा, आमदार रणधिर सावरकर यांचे आरोग्य केंद्राला निर्देश

सुगत खाडे

अकोला  ः एखादा दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह किंवा वाहक असल्यास त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात कोरानाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खडकी भागातील सर्व दुकानदारांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करा, असे निर्देश आमदार रणधिर सावरकर यांनी खडकी/सिंधीकॅम्प नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. शुक्रवारी (ता.१७) खडकी नागरी आरोग्य केंद्रामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

परिसरातील नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रणधिर सावरकर यांनी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून परिसरातील लोकसंख्या किती, आरोग्य केंद्रांतर्गत किती कर्मचारी, आशा काम करतात, कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत, नागरिकांच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या आहेत का, परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण किती, बरे झालेले किती याबाबत आढावा घेतला. त्यानंतर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, परिसरात तत्काळ सर्व्हे करण्याचे व त्यानंतर येथील प्रत्येक दुकानदाराची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीला एसडीएम डॉ. निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, नगरसेवक विनोद मापारी, शारदा ढोरे यांचे पती वैकुंठ ढोरे, विजय इंगळे, मेडिकल ऑफिसर डॉ.विजय इंगळे, नागरी आरोग्य केंद्राचे सुपरवायझर अजय गावंडे, योगेश माल्टे, एस.आय. सुनील खेते आदी अधिकारी, कर्मचारी, आशा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
 

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT