Ration grain Sakal
अकोला

Ration Scam : वाशीम जिल्ह्यात रेशन माफियाचा वाढता हैदोस; १ हजार क्विंटल पेक्षा अधिक धान्य जप्त

सहा महिन्यात १ हजार १५० क्विंटलपेक्षा अधिक रेशनधान्य महसूल व पोलिस विभागाने जप्त

सकाळ वृत्तसेवा

मंगरूळपीर : वाशीम जिल्ह्यात रेशनधान्याची अवैध वाहतूक आणि काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. चालू वर्षात अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल १ हजार १५० क्विंटलपेक्षा अधिक रेशनधान्य महसूल व पोलिस विभागाने जप्त केले आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हेही दाखल आहेत. जिल्ह्यात राशनमाफियांनी पुन्हा हैदोस सुरू केला असून कारवाई करण्यात प्रशासन चालढकल करीत आहे.

वाशीम जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सद्यःस्थितीत २ लाख २५ हजार ८७९ पेक्षा अधिक रेशनकार्डधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून मोफत तांदूळ आणि गव्हाचे वितरण केले जाते. या लाभार्थींना मिळणारे धान्य मात्र काळ्या बाजारात विकण्यात येत असल्याचा धंदा जिल्ह्यात जोरात सुरू आहे.

रेशनच्या शेकडो क्विंटल तांदूळ आणि गव्हाची अवैध वाहतूक करणारी वाहने पोलिसांकडून पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिली जात आहेत. चालू वर्षात १० जुलैपर्यंत रेशनच्या धान्याची अवैध वाहतूक करणारी वाहने पोलिस आणि महसूल विभागाने ताब्यात घेत ६० क्विंटलपेक्षा अधिक गहू आणि जवळपास १ हजार १०० क्विंटलपेक्षा अधिक तांदूळ जप्त केला आहे.

सर्व प्रकरणे न्यायालयात

अवैधरीत्या रेशनधान्याची वाहतूक करणारे वाहन धान्यासह ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात प्रकरण दाखल केले जाते. जप्त केलेले वाहन त्या वाहनाच्या किमतीएवढे क्षतीपूर्ती बंधपत्र घेऊन वाहनात कोणताही बदल न करण्याच्या अटीवर, तसेच न्यायालयाच्या निकालापर्यंत वाहन न विकण्याच्या अटीवर संबंधित वाहनचालकाच्या ताब्यात दिले जाते.

कारंजा, मंगरूळपीर तालुक्यात प्रमाण अधिक

जिल्ह्यातील प्रत्येकच तालुक्यात काळ्या बाजारात नेण्यात येत असलेले रेशनधान्य जप्त करण्यात येत असले तरी मंगरूळपीर आणि कारंजा तालुक्यात रेशनधान्याच्या काळ्या बाजाराचे प्रमाण लक्षणीय आहे. हे दोन तालुके रेशनधान्याच्या काळ्या बाजाराचे केंद्रच असल्याचे कारवाईतून स्पष्ट होते.

जप्त केलेले धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत

अवैधरीत्या वाहतूक करण्यात आलेले रेशनचे गहू आणि तांदूळ जप्त करण्यात आल्यानंतर त्याचा रीतसर अहवाल तयार होतो. जप्त केलेले धान्य शासकीय गोदामात ठेवले जाते. त्यानंतर चक्राकार पद्धतीने हे धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत वितरित केले जाते.

चालू वर्षात काळ्याबाजारात नेण्यात येत असलेले १ हजार ६० क्विंटलपेक्षा अधिक धान्य वाहनासह जप्त केले आहे. ही प्रकरणे न्यालयात वर्ग करण्यात आली असून, जप्त केलेले धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत वर्ग करण्यात आले आहे.

- राजेश वझिरे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT