home akola.jpg 
अकोला

घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी....क्लिक करा आणि वाचा

सुगत खाडे

अकोला : बांधकाम क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी मंदी, कोरोनाचे संकट, यामुळे उपाययोजना व नागरिकांचे जीव वाचवण्यात व्यस्त असलेल्या सरकारने पुढील आदेशापर्यंत रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत. त्यामुळे घरांची खरेदी करण्याऱ्यांना नागरिकांना मंदीच्या या काळात सरकारने दिलासा दिला आहे, परंतु बांधकाम साहित्याच्या किंमतीत झालेली वाढ व बांधकाम क्षेत्रावर आतापर्यंतची सर्वात मोठी अवकळा आल्यामुळे नागरिकांचं घराचं स्वप्न महागणार आहे. 

देशभर कोरोनाचे संक्रमण वाढत चालल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक मंदी आली आहे. महामारीच्या भीतीने मजूर स्वगृही परतले आहेत. तयार प्रॉपर्टी जसे फ्लॅट, दुकान, बंगले, ड्युप्लेक्स आदींची विक्री थांबली आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज लावला जात आहे. आधीपासूनच गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला कोरोना व्हायरसने अधिक संकटात टाकलं आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्यवसाय कोरोना व्हायरसच्या आधीपासूनच संकटात होता. या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी किमान वर्ष दोन वर्षे लागणार असल्याचे मत बिल्डरांनी व्यक्त केले आहे. टाळेबंदीतून सुटका झाल्यानंतर सुद्धा रिअल इस्टेट क्षेत्रात उभारी येणाऱ्या शक्यता कमी असल्याने या व्यवसायात कोट्यवधी रुपये गुंतवणारे व्यावसायीक आता आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे रेडीरेकनरचे दर कायम असले तरी नागरिकांना स्वताःच्या घरात जाण्यासाठी जास्त किंमत द्यावी लागेल. 

भाववाढीचा परिणाम 
कोरोना संकाटामुळे बांधकाम साहित्याचे दर वाढत आहेत. सिमेंट, लोहा, इलेक्ट्रॉनिकचे साहित्य, स्टाईल्स व घर बांधकामासाठी लागणाऱ्या इतर साहित्याच्या किंमतीत वाढ होत आहे. त्याचा परिणाम घरांच्या किंमतीवर सुद्धा दिसून येईल. परिणामी फ्लॅट, दुकान, बंगले, ड्युप्लेक्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता बिल्डरांनी व्यक्त केले आहे.

घरांच्या किंमतीत 8 ते 10 टक्के वाढीची शक्यता
कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रात अवकळा आली आहे. बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. टाळेबंदी असूनही सिमेंटचे दर 270 रुपये प्रती गोणी वरुन 400 रुपयावर पोहचले आहे. इतर साहित्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे घरांचे बांधकाम कमी होऊन मागणी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी घरांच्या किंमतीत 8 ते 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 
- पंकज कोठारी
माजी राज्य उपाध्यक्ष (क्रेडाई) व बांधकाम व्यावसायिक, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT