Ten rupees coin sakal
अकोला

दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार!

दहा रुपयाचे नाणे स्थानिक तथा परिसरात सर्वत्र स्वीकारण्यास चक्क नकार मिळत असून त्यामुळे सदर नाणी बंद झाल्याची अफवा पसरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन : दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास सर्वत्र नकार मिळत असून, हा राजमुद्रेचा अवमान आहे. बँकांनी व प्रशासनाने याकडे डोळेझाक केली, त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयाचे नाणे स्थानिक तथा परिसरात सर्वत्र स्वीकारण्यास चक्क नकार मिळत असून त्यामुळे सदर नाणी बंद झाल्याची अफवा पसरली आहे. आता नागरिकही हे नाणे एकमेकांकडून स्वीकारत नसल्याने नाणे चलनातून बाद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दहा रुपयाचे नाणे राज्यासह, महाराष्ट्रातील बहुतांश भागात चलनात असल्याचे दिसून येते, मात्र शिरपूर व परिसरात दहा रुपयाची नाणी कोणी स्वीकारण्यास तयार नाही. हे नाणे बंद झाल्याचे कोणतेही आदेश रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाने दिले नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. मात्र शहरातील व परिसरातील दुकानदार सदर नाणे स्वीकारण्यास नकार देतात तर हे नाणे त्यांच्याकडून ही कोणी स्वीकारत नाही. अनेकांकडे दहा रुपयाचे नाणे असूनही ते तसेच पडून आहेत. काही जणांनी तर ही नाणी चक्क मोडीत दिल्याचे प्रकार पहावयास मिळतात. राजमुद्रेचा सुरू असलेल्या अवमानास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दहा रुपयाच्या नाण्यांचे परिसरात चलनच बंद झाले आहे.

दहा रुपयाचे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी व ग्राहकांनी स्वीकारावे, अशा सूचनांचे फलक सर्व बँकांनी व पतसंस्थांनी आपापल्या बँकेत लावल्यास ग्राहकांमधील गैरसमज दूर होईल असे मत काहींनी व्यक्त केले आहे. दहा रुपयाची नाणी हे रिझर्व बँकेने जारी केलेले कायदेशीर टेंडर आहे आणि ते स्वीकारण्यास नकार देणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. वीस रुपयाची नाणी चलनात आहे, ते मात्र व्यवहारात स्वीकारले जात आहेत.मात्र काही दिवसांनी या नाण्याची हीच गत होण्याची शक्यता बाळगून आतापासूनच हे नाणे घेण्याचे टाळले जात आहे, त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. दहा रुपयाचे नाणे हे चलनात असून याबाबत प्रशासनाने वृत्तपत्रातून वारंवार खुलासा दिला आहे. ग्राहकांनी ते घ्यावे असे आवाहनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Video: नवीन चलनी नोटांनी भरलेले वायुसेनेचं विमान रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा मृत्यू, ३० जखमी, पण लोकांना दिसल्या फक्त नोटा

अग्रलेख : सत्तेची ‘नशा’ उतरवली

Panchang 28 February 2026: आजच्या दिवशी हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

T20 WC, Semi Final Fixture : इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचला, पण कोणाला भिडणार? वानखेडे स्टेडियमवर कल्ला होणार... जाणून घ्या समीकरण

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २८ फेब्रुवारी २०२६ ते ६ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT