tur sakal
अकोला

Akola News : शेतकऱ्यांना दिलासा! आवक कमी झाल्याने तुरी १२ हजारांवर

महिनाभरात तुरीच्या दरात हळूहळू वाढ होऊन आता प्रतिक्विंटल १२ हजारावर भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - महिनाभरात तुरीच्या दरात हळूहळू वाढ होऊन आता प्रतिक्विंटल १२ हजारावर भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे. गेल्या हंगामात तुरीचे उत्पादन कमी झाले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुरीला सरासरी नऊ हजाराहून अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने २०२३-२४ करीता जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीनुसार ४०० रुपयांची वाढ देत तुरीला प्रतिक्विंटल ७००० रुपये दर जाहीर केला. मात्र, आजपर्यंत एकाही वर्षी शासनाने शेतकऱ्यांच्या ५० टक्के सुद्धा तुरीची खरेदी केलेली नाही.

शिवाय खते, बियाणे, मजुरी, एकंदरीतच उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल आठ ते दहा हजार रुपये भावाची अपेक्षा होती. गेल्या हंगामात तुरीचा पेराही वाढला होता. मात्र, वातावरणातील बदलाचा परिणाम होऊन अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही.

परिणामी मागणी अधिक व आवक कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा सुरुवातीपासूनच सहा हजाराहून अधिक दर तुरीला मिळाले. हळूहळू त्यामध्ये वाढ होत जाऊन, जुलै-ऑगस्टमध्ये ९००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

सप्टेंबरमध्ये मात्र, दोन ते तीन हजार रुपयांची वाढ होऊन दोन आठवड्यांपासून सरासरी दहा हजार तर, बुधवारी (ता.१३) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल १२१०५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. गेल्या वर्षीच्या तुरीला मिळालेल्या या भावामुळे या वर्षीच्या हंगामातील तुरीला देखील चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

मात्र, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून अतिवृष्टी व दीर्घ दांडी अशा विस्कळीत मॉन्सूनमुळे मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक जळाले असून, उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

अकोला बाजार समितीत दोन आठवड्यातील तुरीचा भाव

तारीख भाव (प्रती क्विंटल)

१३ सप्टेंबर ५३०० ते १२१०५

१२ सप्टेंबर ८००० ते ११४४५

०९ सप्टेंबर ८००५ ते १२०५५

०६ सप्टेंबर ७५०० ते १२२३०

०५ सप्टेंबर ७५०० ते १२०१०

०४ सप्टेंबर ६८०० ते १२५००

०२ सप्टेंबर ६००० ते १२०००

०१ सप्टेंबर ८९७५ ते ११८८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; चार तरुण गंभीर जखमी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT