murderer attack sakal
अकोला

Patur Crime : वाळू माफियांच्या जीवघेण्या हल्ल्यात पत्रकार जखमी

पिंपळखुटा येथे एका पत्रकारावर वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

पातूर - चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे एका पत्रकारावर वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ता. २६ मे रोजीच्या दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पत्रकार राहुल देशमुख गंभीर जखमी झाले.

वाळूची अवैध वाहतूक होत असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून राहुल देशमुख यांच्यावर पाच जणांनी लोखंडी रॉड व दगडाने मारहण करून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फिर्यादीच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकार, कैलास परसराम वाहोकार, परसराम गणपत वाहोकार, समीर अरविंद देशमुख, शुभम नागोराव देशमुख यांच्याविरुद्ध भादंविच्या २९४, ३२४, १४३, १४७, १४८, ४२७, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहेत.

वाळू माफियांकडून झालेल्या या हल्ल्याबाबत पत्रकार संघटनेकडून निषेध व्यक्त करून वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT