Fraud
Fraud sakal
अकोला

वाशीम : रिसोडच्या ‘नटवरलाल’चा गुजरातमध्ये कोट्यवधींचा गंडा!

सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि. वाशीम) - आयकर विभाग म्हटले की, सर्वसामान्य माणूसही धास्तावतो. त्यात व्यापारी असले तर, आता धडगत नाही अशी, परिस्थीती निर्माण होते. मात्र, आयकर विभागाने घातलेला छापाच नकली निघाला तर तक्रार करावी कुठे? असा पेच गुजरातेतील व्यापाऱ्यांना पाडणारा. आधुनिक ‘नटवरलाल’ रिसोड शहरात निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ‘नटवरलाल’च्या शोधात गुजरात पोलिस रिसोड शहरात दाखल झाली आहे. त्यामुळे परिसरात ‘नटवरलाल’ हा विषय चर्चेचा ठरत आहे.

नकली आयकर अधिकारी बनून अक्षरशः विविध श्रीमंत लोकांच्या घरी धाड टाकण्याचे नाटक करत लूटमार करण्याचे प्रकार करून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या रिसोड येथील डॉ. अल्लामा इक्बाल उर्दू हायस्कूलचा शिक्षक इरशाद अहमदला अटक करण्यासाठी गुजरातच्या दाहोद पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ता.२० सप्टेंबर रोजी शाळा व इरशाद अहेमदच्या घराची झडती घेतली. मात्र, आरोपी पसार होण्यास सफल झाला. इरशाद अहेमद याने रिसोड शहर व तालुक्यातील आपल्या काही साथीदारांसोबत मिळूण नकली ओळखपत्र बनवून आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचा बनाव करीत गुजरातच्या दाहोद मधील काही श्रीमंत लोकांच्या घरी धाडी टाकल्या.

धाडी दरम्यान घराची झडती घेण्याचे नाटक करत चक्क तिजोरी, कपाटातले रोख रक्कम आणि दागिने पळविण्याचा काम सुद्धा या गॅंगने केले असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दाहोद पोलिसात विविध प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले. एका ठिकाणी अशाच प्रकारची धाड टाकली असता, गुजरात पोलिसांनी त्यांचा भांडाफोड केला व यातील दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली. मात्र, इरशाद अहमद तिथून पसार होण्यास सफल झाला असल्याचे सूत्रांकडून कळाले व तपासात इरशाद अहेमद आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दाहोद पोलिस २० सप्टेंबर रोजी रिसोडात दाखल झाली होती. गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याबाबत कबुली दिली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून कळाले तर, त्यांनी कशा प्रकारे हा गुन्हा केल्याबाबत पोलिसांना सुद्धा माहिती दिली आहे.

छापा टाकण्याची करत होते तालीम

इरशाद अहेमद हा आपल्या साथीदारांसोबत आधी श्रीमंत व्यापारी व व्यावसायिक यांची माहिती मिळवत होता. त्यानंतर त्या घरावर छापा टाकण्याची रंगीत तालीम साथीदारांसोबत करत होता. प्रत्यक्ष छाप्याच्या दिवशी नकली ओळखपत्र दाखवत घरात प्रवेश करून तिजोरी, लाॅकर मधील मौल्यवान दागीणे, नगदी रुपये जप्त करण्याच्या बहाण्याने पोबारा करत होता. या नकली छाप्यात कोट्यावधी रुपये या ‘नटवरलाल’ ने उडविले असल्याची माहिती समोर आली असल्याने रिसोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT