Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

PM Modi On Rahul Gandhi: "गंमत म्हणजे इथे काँग्रेस मरत आहे आणि तिकडे पाकिस्तान रडत आहे. आता पाकिस्तानी नेत्यांनी काँग्रेससाठी प्रार्थना करावी."
PM Modi|Rahul Gandhi|Loksabha Election 2024|Pakistan
PM Modi|Rahul Gandhi|Loksabha Election 2024|PakistanEsakal

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी आज गुजरातमधील आनंद येथे निवडणूक सभेत भाषण केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने 60 वर्षे बँकांवर कब्जा केला. काँग्रेसचे राजपुत्र संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत, पण काँग्रेसने मला उत्तर द्यावे की या देशात 75 वर्षे भारताच्या सर्व भागांना संविधान लागू होते का? (PM Modi On Rahul Gandhi)

पंतप्रधानांनी पुढे काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हणाले, "योगायोग बघा, आज भारतात काँग्रेस कमकुवत होत आहे. गंमत म्हणजे इथे काँग्रेस मरत आहे आणि तिकडे पाकिस्तान रडत आहे. आता पाकिस्तानी नेत्यांनी काँग्रेससाठी प्रार्थना करावी." राजकुमारला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे आणि काँग्रेस आणि पाकिस्तानची ही भागीदारी आता पूर्णपणे उघड झाली आहे.

PM Modi|Rahul Gandhi|Loksabha Election 2024|Pakistan
Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

कमकुवत काँग्रेस सरकार दहशतवादाच्या सूत्रधारांना डॉजियर देत असे. मोदी सरकार डॉजियरमध्ये वेळ घालवत नाही. घरात घुसून दहशतवाद्यांना ठार मारतो.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशाने 60 वर्षे काँग्रेसची राजवट पाहिली आहे. आता देशाने भाजपचा 10 वर्षांचा सेवेचा कालावधीही पाहिला आहे. तो राजवटीचा काळ होता, हा सेवेचा काळ.

पीएम मोदी पुढे म्हणाले, "मी काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज फडकावून आणि भारतीय संविधान लागू करून सरदार साहेबांचे स्वप्न पूर्ण केले. एकेकाळी दहशतवाद्यांची निर्यात करणारा देश पाकिस्तान आता घरोघरी पीठ मागत भटकत आहे."

PM Modi|Rahul Gandhi|Loksabha Election 2024|Pakistan
PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

पीएम मोदींनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर निशाना साधला. त्यांनी यावेळी काँग्रेसला तीन आव्हाने दिली आहेत.

ते म्हणाले की, मी काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांना तीन आव्हाने देतो. आधी त्यांनी मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही, असे लेखी द्यावे. दुसरे म्हणजे, काँग्रेस एससी-एसटीच्या आरक्षणात कोणताही अडथळा आणणार नाहीत. आणि तिसरे, ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेत आहेत ते व्होट बँकेचे राजकारण करणार नाहीत आणि ओबीसी आरक्षण कमी करून मुस्लिमांना देणार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com