Rohit Pawar Sangharsh Yatra concluded in presence of Sharad Pawar akola Sakal
अकोला

Akola News : रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचा शरद पवारांच्या उपस्थितीत समारोप

नागपुरात १२ डिसेंबरला आयोजन; अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती

सकाळ वृत्तसेवा

Akola News : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा काढली आहे. या संघर्ष यात्रेचा समारोप खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ता. १२ डिसेंबरला नागपूर येथे होणार आहे.

या समारोप समारंभाला खुद्द पवार साहेब उपस्थित राहतील, अशी माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिली. अकोला येथील शिवापूर परिसरात असलेल्या मातोश्री वृद्धाश्रम परिसरात राकाँच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते डॉ. संतोष कोरपे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, प्रा. विश्वानाथ कांबळे, पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे, रविकांत वरठे, राकाँचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष रफिक सिद्धीकी व इतर नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अनिल देशमुख यांनी नागपूर आयोजित होणाऱ्या समारोप समारंभाबाबत माध्यमांना माहिती दिली. आमदार रोहित पवार यांनी शेतकरी, युवक व राज्यातील विविध प्रश्नाबाबत काढलेली संघर्ष यात्रा ८०० किलोमीटरचा प्रवास करीत १२ डिसेंबरला विधिमंडळ अधिवेशन काळात नागपूर येथे पोहोचणार आहे.

योगायोगाने त्याच दिवशी खासदार शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या उपस्थितीतच संघर्ष यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असल्याचे श्री देशमुख यांनी सांगितले.

सरकारचा मानस भांडणे लावण्याचा

ओबीसीच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात जो संघर्ष सुरू आहे, त्यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे. भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मुद्द्यावरून दोन जाती, समाजामध्ये संघर्ष घडवून आणत आसल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधणार लक्ष

कापसू, सोयाबीनचे दर व धानाचे दर व बोनस या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात निवेदने दिले जातील. पाशा पटेल व देवेंद्र फडणवीस यांनी दहा वर्षांपूर्वी दिंडी काढून दरवाढ करण्याची मागणी केली होती.

आता फडणवीस सत्तेत आहेत व कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत, तेव्हा त्यांनी कापसाला १४ हजार व सोयाबीनाल आठ हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. सोलर फिडरच्या माध्यमातून वीज देण्यासाठी आणखी तीन वर्षे लागलतील. तोपर्यंत शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी, असा प्रश्नही देशमुख यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाचा उल्लेख करून उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: जूनमध्ये तब्बल 13 दिवस बँकांना सुट्टी! महाराष्ट्रात किती दिवस बंद राहणार बँका? RBI ची यादी पाहा

Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Latest Marathi Update Live: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा मांढरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर हवालदारला सीबीआय कोठडी

SCROLL FOR NEXT