RTE admission sakal
अकोला

RTE Admission : शाळा सुरू, आरटीई प्रवेश रखडलेलेच; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

सोमवारपासून (ता.१) शाळांचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही आरटीई प्रवेशाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - सोमवारपासून (ता.१) शाळांचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही आरटीई प्रवेशाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आरटीई प्रवेश रखडल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शाळा सुरू होऊनही आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश झाला नसल्याने पालक चिंतेत पडले आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी १६ मे पासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रक्रियेअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर शासन स्तरावर लॉटरी काढण्यात आली. परंतु सध्या आरटीई प्रवेशाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल, असा संदेश शासनाच्या आरटीई प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

१८ जून रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्चन्यायालयाने आरटीई प्रवेशाच्या याचिकेची सुनावणी ११ जूलैपर्यंत पुढे ढकलल्याची माहिती आहे. आरटीई २५ टक्के आरक्षणाच्या संदर्भात ९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने एक अधिसूचना काढून आरटीई प्रवेश पक्रियेत बदल केला होता.

या बदलानुसार आरटीई प्रवेशात १ किलोमीटर परिसरात शासकीय आणि अनुदानित शाळेतच प्राधान्याने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. त्यात खासगी विनाअनुदानित शाळांना वगळण्यात आले होते. मात्र, या निर्णयाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

त्यावर हायकोर्टाने सरकाच्या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केली होती. मात्र, काही शाळांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. दरम्यान, शिक्षण विभागाने ७ जूनला लॉटरी सोडत काढली. परंतु, सदर प्रक्रिया न्याय प्रविष्ट असल्याने लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला नाही. आता ११ जुलै रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याचा परिणाम आरटीईचे प्रवेश लांबणीवर पडणार आहेत.

आरटीई प्रवेशाची स्थिती

  • नोंदणीकृत शाळा - १९७

  • रिक्त जागा - २०१०

  • प्राप्त अर्ज - ६४५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT