holi sakal
अकोला

Holi 2024 : संजय कुटे यांनी सहकुटुंब सहभागी होऊन आदिवासी समाज बांधवांसोबत साजरी केली होळी

जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री डाँ संजय कुटे यांनी होळी सणाच्या निमित्ताने उमापूर येथे जाऊन आदिवासी सोबत होळी साजरी केली.

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर(जि बुलढाणा) : जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री डाँ संजय कुटे यांनी होळी सणाच्या निमित्ताने उमापूर येथे जाऊन आदिवासी सोबत होळी साजरी केली. आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आयोजित भोंगऱ्या उत्सवात आमदारांनी सहकुटुंब सहभागी होऊन आदिवासी सोबत होळी सणाचा आनंद घेतला.

आदिवासी बांधवांनी पारंपारिक वादन व नृत्य सादर करून आमदारांचे व त्यांच्या कुटूंबाचे स्वागत केले. आदिवासी बांधवांसोबत माझे अतिशय जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, आदिवासी बांधवानी नेहमीच माझ्यावर प्रेम केले आहे, त्यांच्या सोबत होळीचा उत्सव दरवर्षी साजरा करताना होत असलेला आनंद हा शब्दात व्यक्त न करता येणारा आहे. असे उदगार आमदार कुटे यांनी काढले.

होलिकोत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वांत महत्त्वाचा सण. होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष-महिला असा भेदाभेद नाही. गरीब-श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. मानवी संस्कृतीची मूल्ये जपणारी ही होळी म्हणूनच या आदिवासी समूहांच्या जीवनात महत्त्वाची आहे. यावेळी आदिवासी तरुणांनी मोठ्या उत्साहात आमदारांना रंग लावत सेल्फी चा ही आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT