Akola News esakal
अकोला

Akola News : भारतमातेच्या वीर सुपुत्राला साश्रुनयनांनी निरोप

शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ डिजिटल टीम

अकोला : जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहिद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यांच्यावर आज मोरगाव भाकरे येथे राजशिष्टाचारानुसार व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहिद प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव सैन्यदलाच्या तुकडीकडून मूळ गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाची तुकडी, तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. खासदार अनुप धोत्रे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार नितीन देशमुख, आमदार संजय कुटे, जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्यदलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ‘शहिद प्रवीण जंजाळ अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादला होता.

सैनिकांचे गाव म्हणुन मोरगांव भाकरे गावाची ओळख असून येथे आजवर 90 युवक सैन्यात भरती झालेले आहेत.शहीद जवान प्रविण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT