अकोला

अनुदानावर रब्बी बियाणे वाटप! ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळीतधान्यअंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषी साहाय्यकांशी संपर्क करून १० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी ३० ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल असे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रम अंतर्गत वाशीम जिल्ह्यात कडधान्य-हरभरा, पौष्टिक तृणधान्य-रब्बी ज्वारी, गळीतधान्य-करडईसाठी राबविण्यात येतो. बियाणे वितरणामध्ये हरभरा बियाण्यासाठी दहा वर्षाआतील वाणास २५ रुपये प्रति किलो, दहा वर्षावरील वाणास १२ रुपये प्रति किलो, रब्बी ज्वारी बियाण्यासाठी दहा वर्षाआतील वाणास ३० रुपये प्रति किलो, दहा वर्षावरील वाणास १५ रुपये प्रति किलो, करडई बियाण्यासाठी ४० रुपये प्रति किलो, गहू बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास २० रुपये प्रति किलो, १० वर्षावरील वाणास १० रुपये प्रति किलो या दराने एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे.

प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन हजार रुपये ते चार हजार रुपये प्रति एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याचे आवाहन

कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून, पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT