Sexual harassment
Sexual harassment Esakal
अकोला

लग्नाचे आमिष देऊन प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : तरुणीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगीक अत्याचार करणाऱ्या प्रियकराला बाळापूर पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने दगाबाज प्रियकराची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली.

१८ वर्षीय तरुणीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यांनतर तिला लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय प्रियकराने सतत लैंगीक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना वाडेगाव पोलिस चौकी अंतर्गत गोरेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने बाळापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तिच्यावर घडलेला प्रसंग पोलिसांना सांगीतला.

पोलिसांनी दगाबाज प्रियकरावर अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय हांडे (वय २४) रा. गोरेगाव असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दगाबाज प्रियकराचे नाव आहे. आरोपी अक्षयची पीडित तरुणीशी एका वर्षापासून मैत्री होती. याच मैत्रीचा फायदा घेत आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यांनतर तिला प्रेमाची भुरळ घालून लग्नाचे आमिष दाखवले. त्यामुळे पीडिता दगाबाजाच्या अमिषाला बळी पडली.

काही दिवसांपूर्वी प्रियकर पीडितेच्या घरी गेला व आपण नागपूर येथे जाऊन आपण लग्न करू असे, म्हणून तिला नागपूर येथे नेऊन अत्याचार केला. पीडितीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता, प्रियकराने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, पीडितेने बाळापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन दगाबाज विरोधात तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अक्षयला अटक केली आहे. पुढील तपास बाळापूर पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT