अकोला

ऐका हो ऐकाऽऽ शिवभोजन केंद्रावर दिले जाते शिळे अन्न

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : शहरातील विश्रामगृह जवळील शिवभोजन केंद्रावर शिळे भोजन देत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत असल्यामुळे शिवभोजन केंद्रावर तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी नायब तहसीलदारांकडून पंचनामा केला. या शिवभोजन केंद्रावर शिळे भोजन दिल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.

गरीब नागरिकांना अल्प दरात पोटभर जेवण मिळावे. जेणे करून कोणी उपाशी राहणार नाही या हेतूने शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केले आहेत. शहरात हे केंद्र विश्राम गृहाजवळ प्रमोद भटकर यांना देण्यात आले. ते ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र या नावाने केंद्र चालवितात. या शिवभोजन केंद्रावर शिवाजी फोकमारे हे शिवभोजन घेण्यासाठी गेले असता त्यांना शिळे अन्न देण्यात आले. याबाबत शिवाजी फोकमारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना माहिती दिली व तेल्हारा तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली.

तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदार यांनी नायब तहसीलदार यांना कर्मचाऱ्यांसह शिवभोजन केंद्राची तपासणी करण्यासाठी पाठविले. फोकमारे यांना दिलेले शिवभोजन शिळे व निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी नाना इंगोले, लाभार्थी शिवाजी फोकमारे, युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे, आकाश इंगळे उपस्थित होते.

शिवभोजन केंद्र हे सर्वसामान्य गरजू नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकार राबवत आहे. परंतु, तेल्हारा शहरातील ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र हे शिळे भोजन देत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून पंचनामामध्ये निष्पन्न झाले आहे. केंद्र परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा शिवसेना आंदोलन करणार आहे.
- प्रा. सचिन थाटे
ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्रातून शिवभोजन घेतले असता शिळे व निकृष्ट दर्जाचे भोजन दिले. याबाबत रीतसर तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. सदर शिवभोजन केंद्रात नेहमीच शिळे भोजन दिले जाते. त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
- शिवाजी फोकमारे, शिवभोजन लाभार्थी
ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्राची तक्रार प्राप्त होताच नायब तहसीलदार विजय सुरडकर यांनी शिवभोजन केंद्राला भेट देऊन पंचनामा केला. यावेळी घडलेला प्रकार माझ्या चुकीने घडला असे मान्य करीत शिवभोजन केंद्र चालकाने कबुली दिली. तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
- डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT