निधी!
निधी!  sakal
अकोला

अकोला : आमदारांना तोकडा निधी!

सुगत खाडे

अकोला - आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन् २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील आठ आमदारांना विकास कामांसाठी शासनामार्फत २८-२८ लाख रुपयांचा विकास निधी देण्यात आला आहे. सदर निधी अतिशय अल्प असल्याने आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी व त्यात समतोल राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक आमदाराला शासनाकडून निधी दिला जातो. यात पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे करता येतात. आमदारांनी सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजूरी दिली जाते आणि कामे प्रत्यक्ष अंमलात आणली जातात. छोटी-छोटी कामे करून मतदारांना खुश करण्याकरिता आमदार निधीचा आमदारांना उपयोग होतो.

आमदार निधीतून कामे केल्यावर त्या-त्या भागांमध्ये आमदारांकडून फलक लावून जाहिरातबाजी केली जाते. पुढील निवडणुकीत मतांसाठी या निधीचा चांगला उपयोग होतो. निवडून आल्यास आमदार निधीतून ही कामे करीन, असे आश्वासन प्रचाराच्या काळात दिली जातात. काही आमदार तर गल्लोगल्ली आपल्या आमदार निधीतून केलेल्या कामांची जाहिरात करीत असतात. दरम्यान सन् २०२२-२३ या वर्षात आमदारांना त्यांच्या मतदार संघात विकास कामे करता यावी यासाठी प्रत्येकी २८-२८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्ह्यातील एका आमदाराचे २८ लाख या प्रमाणे आठ आमदारांचे २ कोटी २४ लाख रुपयांचा निधी नियोजन विभागाला मिळाला आहे. सदर निधी अतिशय तोडका असल्याने आमदारांना त्यांच्या मतदार संघात विकास कामे प्रस्तावित करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून मतदारसंघात विकासाचा समतोल राखण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

यंदापासून मिळणार ५-५ कोटींचा निधी

राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी पाच कोटी रुपये करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यामुळे यावर्षापासून आमदारांना एका वर्षात विकास कामांवर खर्च करण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटी रुपये मिळणार आहेत.

विकास निधी खात्यात जमा

नियोजन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा, अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिष पिंपळे, बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, विधान परिषदेचे सदस्य डॉ. रणजीत पाटील, विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी व विधान परिषदेचे सदस्य वसंत खंडेलवाल यांना विकास कामांसाठी प्रत्येकी २८-२८ लाख रुपये मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT