shortage of 100 rs stamp paper Sakal
अकोला

Stamp Paper : तेल्हारा शहरात १०० रुपयांच्या स्टॅम्‍प पेपरचा तुटवडा

तेल्हारा शहरात १०० रुपयाचा स्टॅम पेपर शेतकऱ्यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : शहरात गत काही दिवसांपासून १०० रुपयाच्या स्टॅम पेपरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे स्टॅम पेपर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. आता खरिपाचा हंगाम तोंडावर आहे, बी-बियाणे, खते, पेरणी आणि शेतीसाठी लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांची आता पीक कर्ज काढण्यासाठी लगभग सुरू आहे.

त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह स्टॅम पेपरची शेतकऱ्यांना आवश्यकता भासत आहे. असे असले, तरी तेल्हारा शहरात १०० रुपयाचा स्टॅम पेपर शेतकऱ्यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे.

येथील स्टॅम पेपर विक्रेत्यांना स्टॅम पेपर उपलब्ध करण्यासाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तिन दिवस ठरवून दिले आहेत. त्यासाठी त्यांना आधी चलान भरावी लागते. त्यात वारंवार येणाऱ्या सुट्या पाहता सध्या स्टॅम विक्रेत्याजवळ स्टॅम पेपर उपलब्ध नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांना स्टॅम पेपर उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी असल्याने त्यांना आपले सर्व कामे बाजुला सावरत स्टॅम पेपर मिळविण्यासाठी सध्या भटकंती करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Rainfall Record Scam : पावसाच्या आकड्यांमध्ये हेराफेरी करून 15 कोटींचे नुकसान? माजी खासदाराच्या 'त्या' आरोपाने कृषी विभागात खळबळ, 'स्कायमेट'ला धाडली नोटीस

TCS Company Case : निदा खानच्या कुटुंबीयांची चौकशी; संशयितांना मदतप्रकरणी ‘बडा नेता’ही चौकशीच्या रडारवर

Latest Marathi News Update : नागपुरात 1.49 कोटींच्या मुद्देमालासह 150 किलो गांजा जप्त

Indapur GP Reservation Draw: इंदापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत १२ जूनला; आगामी निवडणुकांचे बिगुल

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडचे शतक! भारताचा थरारक विजय, श्रीलंकेने हातचा सामना गमावला; आगरकरच्या उपस्थितीत पोरं चमकले

SCROLL FOR NEXT