‘श्रीं’च्या पालखी दिंडीत सहभागी झालेले वारकरी. Sakal
अकोला

वारकरी होऊ, पंढरीस जाऊ...पाहुनिया विठ्ठला, आनंदात न्हाऊ...!

७०० वारकऱ्यांसह ‘श्रीं’ची पालखी जिल्ह्यात दाखल

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर - टाळ चिफळ्यांचा गगनभेदी निनाद..., एक मुखाने माऊलींचा जयघोष... व विठ्ठल-रुखमाईच्या नामघोषाने सर्वत्र भक्तीयम वातावरणत ‘श्रींं’च्या पालखीचे अकोल्यातील पारस व गायगाव येथे स्वागत करण्यात आले. संतनगरी शेगाव येथून सोमवारी (ता.६) सायंकाळी ७०० वारकरी भक्तांसंगे श्री गजानन महाराजांची पालखी बाळापूर तालुक्यात दाखल झाली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या अवधीनंतर शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरामधून संत श्री गजानन महाराजांची पालखी सोमवारी (ता.६) अकोला जिल्ह्यात दाखल झाली. बाळापूर तालुक्यातील पारस येथे सोमवारी पालखीचा मुक्काम होता. गत चार दशकांपासून गजानन महाराज, शेगाव पालखी सत्कार समितीच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व भक्तांनी शिस्तबद्द पद्धतीने महाराजांचे दर्शन घेतले.

आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी यंदा ७०० हून अधिक वारकऱ्यांसह, रथ, मेणा, गज, अश्वासह, टाळकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. पालखी निमकर्दा मार्गे गायगावकडे मार्गस्थ होऊन पालखी मंगळवारी (ता.७) रात्री भौरद येथे मुक्कामी आहे. दरम्यान निमकर्दा, गायगाव या ठिकाणी ‘श्रीं’च्या पालखीचे हर्षोउल्हासात स्वागत करण्यात आले, तसेच ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. या मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांंकरिता चहा, नास्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अनेख भाविक भक्तांनी ‘श्रीं’च्या पालखीचे दर्शन घेतले. उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार व पोलिसांनी या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT