Gajanan Maharaj Palkhi  Sakal
अकोला

Gajanan Maharaj Palkhi : श्रीं च्या पालखीचे पंढरपूरहून शेगावकडे प्रस्थान; ११ ऑगस्टला स्वगृही होणार आगमन

दरवर्षी प्रमाणे आषाढ एकादशी निमित्त १३ जून रोजी शेगाव येथून श्री गजानन महाराज संस्थानची पालखी पायीवारी साठी सातशेच्यावर वारकऱ्यांसह रवाना झाली होती. ही पालखी ३३ दिवस ७५० किमी अंतर पायी चालत १५ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली.

सकाळ वृत्तसेवा

पंढरीच्या राया प्रभू दिनानाथा

आज्ञा द्यावी आता येतो आम्ही ।।

राई राखुमाबाई सत्यभामा माता।

आज्ञा द्यावी आता येतो आम्ही ।।

नमस्कार माज़ा गरुड़ हनुमंता।

आज्ञा द्यावी आता येतो आम्ही ।।

नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा।

आज्ञा द्यावी आता येतो आम्ही ।।

शेगाव : या अभंगाचे गायन करीत आषाढी एकादशीचा श्रीक्षेत्र पंढरपूर येथील सोहळा आटोपून श्री संत गजानन महाराजांची पालखीने (ता.२१) रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूरहून शेगावकडे प्रस्थान केले. दरम्यान पालखी परतीच्या मार्गावर निघण्यापूर्वी गुरुपौर्णिमेला पहाटे ३ वाजता काल्याचे कीर्तन करिता गोपाळ पुरीकडे मार्गस्थ झाली. ५ वाजता काला घेऊन पालखी परत श्री संस्थानचे शाखेत पोचली व तदनंतर श्रींचा पालखी सोहळा परतीचे मार्गावर निघाला आहे.

दरवर्षी प्रमाणे आषाढ एकादशी निमित्त १३ जून रोजी शेगाव येथून श्री गजानन महाराज संस्थानची पालखी पायीवारी साठी सातशेच्यावर वारकऱ्यांसह रवाना झाली होती. ही पालखी ३३ दिवस ७५० किमी अंतर पायी चालत १५ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली.

आषाढ एकादशी उत्सवात सहभागी होऊन १५ ते २० जुलै दरम्यान ५ दिवसांचा मुक्काम करून श्री विठ्ठलाच्या भेटीनंतर श्रींचा हा पालखी सोहळा (ता.२१) रोजी पंढरीच्या राया प्रभू दिनानाथा आज्ञा द्यावी आता येतो आम्ही या अभंगाचे गायन करत वारकऱ्यांसह परतीचे मार्गाने शेगावकडे निघाला आहे.

श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५५ वे वर्षे असून पायदळ वारीची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. पंढरपूर ते शेगाव असा जाण्या - येण्याचा १३०० कि.मी. या पायदळ प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत.

असा राहील पालखी परतीचा प्रवास

श्रींचे पालखी परतीचा प्रवास दरम्यान २१ जुलै रोजी पहिला मुक्काम करकंब, २२ जुलै कुईवाडी, २३ ला उपळाई स्टेशन, २४ ला भगवान बार्शी, २५ भुम, २६ चौसाळा, २७ पाली, २८ बीड, २९ गेवराई, ३० शहापूर, ३१ लालवाडी, १ व २ ऑगस्टला जालना, ३ सिंदखेडराजा, ४ बिबी, ५ लोणार, ६ मेहकर, ७ जानेफळ, ८ शिर्ला नेमाने, ९ आवार, १० खामगाव मुक्काम राहणार असून ५५० किमी प्रवास करत ११ ऑगस्ट रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगाव येथे दाखल होणार आहे.

पंढरपूर नगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमली

आज सकाळी श्रींची काकडा आरती झाली. नंतर श्रींचा राजवैभव थाटात अभिषेक सोहळा पार पडला. सकाळी तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाई दर्शन परिक्रमा करून गोपाळपुरा येथे श्रीहरिचे काल्याचे कीर्तन झाल्यावर श्री गजानन महाराज संस्थान शाखा पंढरपूर येथून सकाळी श्रींची पालखी परतीच्या पायदळ वारीस आरंभ झाला. तिर्थक्षेत्र पंढरपूर नगरीमध्ये माऊलीच्या ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठलाच्या नामस्मरणाने पंढरीनगरी दुमदुमून गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता प्रादेशिक सैन्यातही महिलांना संधी मिळणार, भारतीय लष्कराचा प्रायोगिक तत्वावर विचार

Dombivli Politics: टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल; 'स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नकोच'!

Latest Marathi Breaking News : अहिल्यानगर मधील खारेकर्जुन येथे बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Stock Market Today : शेअर बाजाची हिरव्या रंगात सुरुवात; सेन्सेक्स 240 अंकांनी वाढला; तर निफ्टी बँकने उच्चांक गाठला!

Truck Catches Fire: 'ट्रकला आग लागून २९ गायी भस्मसात'; नागपुरातील कत्तलखान्यासाठी गायींची बेकायदा वाहतूक, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT