Gajanan Maharaj Prakat Din sakal
अकोला

Gajanan Maharaj Prakat Din : ‘श्रीं’च्‍या प्रगट दिन उत्‍सवाची सांगता

संतनगरी शेगाव येथे २५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्‍या श्री संत गजानन महाराज यांच्‍या प्रगटदिन उत्‍सवाची सोमवारी कीर्तन, दहीहंडी व गोपालकाल्याने सांगता झाली.

सकाळ वृत्तसेवा

शेगाव : संतनगरी शेगाव येथे २५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्‍या श्री संत गजानन महाराज यांच्‍या प्रगटदिन उत्‍सवाची सोमवारी कीर्तन, दहीहंडी व गोपालकाल्याने सांगता झाली. हा सोहळा पाहण्यासाठी देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

''विदर्भ पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये (ता.३) श्रीं चा १४६ वा प्रगटदिन उत्‍सव मोठ्या उत्‍साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी राज्‍यभरातून व राज्‍याबाहेरुन देखील भाविकांनी श्रीं च्‍या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. तर यावर्षी प्रगटदिन उत्सवात १ हजार ३२ दिंड्या व एकूण ४६ हजार ७०१ वारकरी येऊन गेले. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण १४१ नवीन दिंड्यांना १० टाळ, १ वीणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरित करण्यात आल्या. या उत्‍सवादरम्‍यान संतगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण होते.

मंदिरामध्ये दररोज सकाळी काकडा आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर काल (ता.३) रोजी महारुद्रस्‍वाहाकार यागाची पूर्णाहुती झाल्‍यानंतर सायंकाळी पालखी सोहळा निघाला. यावेळी देखील भाविकांनी दर्शनासाठी रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा गर्दी केली होती. तर आज (ता.४) रोजी काल्याचे कीर्तन, दहीहंडी व गोपालकाल्याने उत्‍सवाची सांगता झाली.

यावेळी राज्‍यातील विविध भागातून मुक्‍कामी आलेले भाविक, भजनी दिंडीमधील वारकरी यांनी सकाळी ७ ते ८ च्या रम्‍यान हभप प्रमोदबुवा राहणे यांचे काल्‍याचे कीर्तन श्रवण केले. यावेळी कीर्तनात हभप प्रमोदबुवा राहणे यांनी श्री संत गजानन महाराज यांचे कार्य व जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्‍या चरित्रावर त्यांनी काल्याचे कीर्तन केले. यानंतर सर्वसमानेतचा संदेश देणाऱ्या दहीहंडीतील गोपालकाल्याचा प्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला. त्‍यानंतर भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्‍या चरणी माथा टेकवित संत नगरीचा निरोप घेतला. यावेळी शहरातील प्रत्‍येक रस्‍त्‍यावर आपल्‍या शहराची वाट धरणाऱ्या दिंड्या दिसून येत होत्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT