Ladki Bahin Yojana sakal
अकोला

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी भावांनी मागितली माफी,योजनेसाठी बनावट अर्ज केल्याने सहा जणांची चाैकशी

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट अर्ज केलेल्या सहा युवकांनी माफी मागितली आहे. त्यांची आधारकार्ड ब्लॉक करण्यात आले असून, पुढील कार्यवाही लवकरच होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सहा युवकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर त्यापैकी दाेघांनी जिल्हा महिला बाल विकास विभागाला खुलासे सादर केले आहेत. त्यांनी सध्या क्षमा मागितली असून उर्वरित सर्वांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही हाेणार आहे. सध्या त्यांची आधारकार्ड ब्लाॅक करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. काही निकष कमी करण्यात आले आहेत. अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. योजनेची अंमलबजावणी प्रभाविपणे व्हावी, यासाठी शासनाकडून नवनवीन सुधारणा झाल्या. याेजनेला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सरकारकडून अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यात पैसेही जमा झाले.

पैसे मिळण्यास प्रारंभ झाल्यानंतर मात्र केवळ महिलांसाठी असलेल्या या याेजनेत पुरुषांनीही अर्ज केले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर आता याप्रकरणी चाैकशीला वेग आला आहे.

जन्मतारखेत ताेडमोड

याेजनेसाठी वयाची अट असल्याने काहींनी ऑनलाईन अर्ज करताना मूळ टी. सी.मधील जन्म तारखेत ताेडमोड केली. आधारकार्डावरही खोडतोड करून चुकीची माहिती दिल्याचे व खोटे दस्तऐवज अपलोड केल्याचे चाैकशीतून पुढे आले आहे. अर्ज करताना खोटे दस्तऐवज सादर केल्याचे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिला आहे.

१ हजार ६६९ अर्ज नामंजूर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत एक हजार ६६९ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यातील बहुता:श अर्जदारांना शासनाच्या अन्य याेजनेतून थेट आर्थिक लाभ मिळत असल्याचे अर्ज नाकारण्यात आला आहे. सध्या एकूण ४ लाख ४४ हाजर ३०३ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ४ लाख ३५ हजार ८५७ मंजूर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Pune Elections 2025 : पुणे महापालिकेची नवी प्रभागरचना जाहीर; ४० प्रभाग चार सदस्यांचे, एक प्रभाग पाच सदस्यांचा

SCROLL FOR NEXT