लग्न लावून देत नाही म्हणून मुलाने केली बापाची हत्या  sakal media
अकोला

लग्न लावून देत नाही म्हणून मुलाने केली बापाची हत्या

कुऱ्हाडीने सासरच्या डोक्यावर व दोन्ही पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले व लाथा भुक्या ने सुद्धा मारहाण केली

सकाळ वृत्तसेवा

जऊळका (जि. वाशीम) : येथील पोलीस स्टेशनमध्ये सौ संजीवनी महादेव भारती यांनी फिर्याद दिली की आरोपी माझा दिर प्रमोद भारती हा माझ्या सासरा धर्मा भारती यांना शिवीगाळ करून म्हणत होता की माझे लग्न का करून देत नाही मला मुंजा ठेवता का असे बोलू लागला. त्यावेळी माझे सासरे त्याला म्हणाले की शिविगाळ करू नको तुला कोणत्या मुलीशी लग्न करायचे ते कर मला काही सांगु नको तेव्हा माझ्या दिराने घरात असलेल्या कुऱ्हाडीने सासरच्या डोक्यावर व दोन्ही पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले व लाथा भुक्या ने सुद्धा मारहाण केली.

माझ्या पतीस सुध्दा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती सौ संजीवनी महादेव भारती यांनी जऊलका पोलीस स्टेशन जबानी दिली आहे. धम्मा भारती हे अंध होते. त्यांना मारहाण जास्त गंभीर झाली होती ही घटना काल रात्री घडली. त्यामुळं गावात एकचं खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांना जऊलका येथील शासकीय रुग्णालयात सोयी सुविधा न भेटल्या मुळे त्यांना अकोला येथे हलविण्यात आले.

त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तपास केला असता पोटच्या मुलानेच हत्या केल्याचं उघड झाले आहे. मुलगा प्रमोद भारती यांनीच हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले असून, प्रमोद विरुद्ध 307 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींला अटक केली असून,पुढील तपास जऊळका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे करीत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR इफेक्ट! पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, निवडणूक आयोगाने यादी केली प्रसिद्ध

IPL मुळे माझं आंतरराष्ट्रीय करियर उद्ध्वस्त झालं..., केवीन पीटरसनचा खळबळजनक दावा; इंग्लंड क्रिकेटवरही आरोप

Shaktipeeth Highway Route Change : 'शक्तिपीठ' महामार्गाचा मार्ग बदलला; माण–खटावमधून जाणार, शिखर शिंगणापूर-गोंदवलेही जोडले जाणार

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ च्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन या वर्षी करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री फडणवीस

बॉम्बस्फोट, सायरन… तरीही ‘ठरलं तर मग’! इस्त्रायलमधील प्रेक्षकांची मालिकेबाबत दिवानगी पाहून थक्क व्हाल, Viral Video

SCROLL FOR NEXT